Chandrashekhar Bavankule News : काँग्रेसला बुथवर बसायला माणूस ठेवू नका; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना सूचना

Chandrashekhar Bavankule on Congress News : भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे भाजपच्यावतीने दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमता चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.
Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar BavankuleSaam TV
Published On

शुभम देशमुख

Bhandra News :

देशातील चार राज्यांतील निवडणुकीतील यशानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह आणि उर्जा निर्माण झाली आहे. राज्यातही भाजपने आपली ताकद आणखी वाढण्यासाठी आता कंबर कसली आहे. काँग्रेसला बुथवर बसायला देखील एक व्यक्ती राहू देऊ नका, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे भाजपच्यावतीने दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांना हे वक्तव्य केलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chandrashekhar Bavankule
Maharashtra Political News : भाजपच्या विजयानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार? काँग्रेस आमदारांचा गट फुटण्याची शक्यता

चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की,  काँग्रेसच्या बूथवर बसायला सुद्धा एकही व्यक्ती राहू देऊ नका. बूथ वाटायला सुद्धा एकही माणूस राहिला नाही पाहिजे. प्रत्येक बुथवर ५० लोकांचा पक्षप्रवेश करा.  (Latest Marathi News)

बुथमधील युवा कार्यकर्त्यांना पक्षात सामील करा, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. अशारितीने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्यानिमित्त भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.

Chandrashekhar Bavankule
Maharashtra Politics: महादेवा मला मंत्री करा, भरत गोगावलेंचं साकडं; कार्यकर्त्यांनाही केली प्रार्थनेची विनंती

विधानसभा निवडणुकीतील भाजपची कामगिरी

चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने तीन राज्यात मुसंडी मारली. छत्तीसगडमध्ये देखील भाजपने अनपेक्षितपणे बहुमत मिळवलं आहे. मध्य प्रेदशात भाजपने १६३ असा प्रचंड बहुमताचा आकडा गाठला. राजस्थानातही ११५ जागांवर भाजपने विजय मिळवला. तर छत्तीसगडमध्येही ५४ जागा काबीज केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com