Maharashtra Politics: महादेवा मला मंत्री करा, भरत गोगावलेंचं साकडं; कार्यकर्त्यांनाही केली प्रार्थनेची विनंती

Maharashtra Cabinet expansion: महादेवा मला मंत्री करा, असं म्हणत गोगावले यांनी महादेवाला साकडे देखील घातलं आहे.
Bharat Gogawle's request for ministership
Bharat Gogawle's request for ministershipSaam TV
Published On

Maharashtra Cabinet Expansion Latest News

शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा भर कार्यक्रमात मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. सत्तेत सहभागी झाल्यानंतर मी मंत्री होईल, असं वाटलं होतं. परंतु अजूनही मला मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे महादेवा मला मंत्री करा, असं म्हणत गोगावले यांनी महादेवाला साकडे देखील घातलं आहे.

कार्यकर्त्यांनी देखील माझ्या मंत्रिपदासाठी प्रार्थना करावी, अशी विनंती देखील भरत गोगावले यांनी केली आहे. हडपसर-हांडेवाडी रस्त्यावरील चौकात प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे. याचे भूमिपूजन भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोगावले यांनी मंत्रिपदासाठी साकडे घातले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bharat Gogawle's request for ministership
Maratha Reservation: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान

काय म्हणाले भरत गोगावले?

सत्तेत सहभागी झाल्यानंतरही मी मंत्री झालो नाही. मात्र, आता प्रभू श्रीरामाच्या पुतळा उभारणीचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले आहे. आता मी मंत्री होईन, अशी आशा आहे. येथील महंमदवाडीचे आता महादेववाडी नामकरण होणार आहे. त्यामुळे हे महादेवा, मला मंत्री करा,’ असे साकडे भरत गोगावले यांनी महादेवाला घातले आहे.

‘मी मंत्री व्हावे, यासाठी सर्व भक्तांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी,’ असे आवाहनही त्यांनी केले आहे. चांगल्या कामासाठी पुढे जाणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे शिवसेनेचे कर्तव्य आहे. महंदवाडीच्या महादेववाडी नामकरणाला गती देऊन ते काम पूर्ण केले जाईल, असं आश्वासनही गोगावले यांनी दिलं आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा लांबणीवर?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच पार पडणार, अशा चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानंतरच मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला जाणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याने मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. सध्या आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीला सामोर जाण्याआधी विस्तार झाला तर कार्यकर्त्यांमध्ये चांगला मेसेज जाऊ शकतो. त्यामुळं विस्तार लवकर व्हावा, अशी मागणी अनेक आमदारांनी केली आहे.

Bharat Gogawle's request for ministership
IMD Rainfall Alert: मिचौंग चक्रीवादळाचा धोका, राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com