Maratha Reservation: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान

Maratha Reservation News: मराठा समाजाला सरसरकट कुणबी प्रमाणपत्र देता येणं शक्य नाही, असं विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे.
Girish Mahajan on Maratha Reservation
Girish Mahajan on Maratha ReservationSaam Digital
Published On

Girish Mahajan on Maratha Reservation

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं. येत्या २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्या, असा अल्टिमेटम देखील जरांगे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राबाबत सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Girish Mahajan on Maratha Reservation
IMD Rainfall Alert: मिचौंग चक्रीवादळाचा धोका, राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार

अशातच भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरून एक मोठं विधान केलं आहे. मराठा समाजाला सरसरकट कुणबी प्रमाणपत्र देता येणं शक्य नाही, असं विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे.

ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र (Maratha Reservation) देण्यात येईल, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. गिरीश महाजन यांच्या या विधानामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. यावर मनोज जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देणार? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाण देण्याच्या मागणीवरून गिरीश महाजन म्हणाले, मनोज जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते. तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणं शक्य नाही, हे मी त्यावेळीच स्टेजवरून सांगितलं होतं.

ज्या लोकांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत, त्यांची तपासणी करून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकार घेईल. जेवढ्या लोकांच्या नोंदी सापडल्या आहे, त्यांना सरकार कुणबीचा दाखला देत आहे. पण कुठल्या कायद्यानुसार देणार? कुठल्या नियमानुसार देणार? हा देखील मोठा प्रश्न आहे, असंही गिरीश महाजन म्हणाले.

Girish Mahajan on Maratha Reservation
Pune Crime News: धक्कादायक! ८८ लाखांचे कर्ज फेडूनही जीवे मारण्याची धमकी; सावकारासह १० जणाविरोधात गुन्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com