Pune Crime News: धक्कादायक! ८८ लाखांचे कर्ज फेडूनही जीवे मारण्याची धमकी; सावकारासह १० जणाविरोधात गुन्हा

Pune Crime News: ८८ लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड करूनही सावकाराने कर्जदारास वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
Pune Crime News
Pune Crime News Saam TV
Published On

Pune Crime News

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ८८ लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड करूनही सावकाराने कर्जदारास वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी सावकारासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Crime News
IMD Rainfall Alert: मिचौंग चक्रीवादळाचा धोका, राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार

राहुल ऊर्फ दिगंबर पुरुषोत्तम काची (वय ३७), सुजित सुधीर लाजुळकर (वय ३४), विकी ढवळे (वय ३५), जयकुमार सदाशिव पाटील (वय ४०), बाळासाहेब ऊर्फ नितीन करंडे (वय ४२), अक्षय सागर, निखिल आल्हाट, संतोष उत्तम सोळसे (वय ३७) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार एका शिक्षण संस्थेत शिपाई आहे. कोरोना काळात तक्रारदाराने सावकाराकडून एका व्यक्तीकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचे व्याज वाढत असल्याने तक्रारदाराने दुसऱ्या व्यक्तींकडून कर्ज काढत पहिल्या व्यक्तींच्या पैशांची परतफेड केली.

तक्रारदाराने १० ते ४० टक्के व्याजासह ८८ लाख २५ हजार रुपये परत केले. परंतु आरोपी मुद्दल आणि व्याजाची मागणी करीत होते. आरोपींनी कर्जरादाराकडून १० तोळ्यांचे सोन्याचे दागिने देखील घेतले. ते देखील परत केले नाही.

दरम्यान, अतिरिक्त व्याजाची रक्कम दिली नाही म्हणून आरोपींनी तक्रारदाराला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. अखेर या धमक्यांना कंटाळून तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी सावकारासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

Pune Crime News
Mizoram Election 2023 Result: मिझोरममध्ये काँग्रेस गेमचेंजर ठरणार? चौरंगी लढतीत कुणाचे सरकार? आज मतमोजणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com