Manasvi Choudhary
गुढी पाडवा हा सण हिंदू नववर्षाचा पहिला आणि अत्यंत महत्वाचा सण मानला जातो.
साडेतीन मुहूर्तापैंकी एक असलेला गुढी पाडवा या सणाला सोन आणि चांदी खरेदी करतात.
उद्या १९ मार्च रोजी गुढीपाडवा हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही देखील पत्नीसाठी सोनं खरेदी करणार असाल तर मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स पाहूया.
मंगळसूत्राच्या मध्यभागी पेंडंट न ठेवता साखळीच्या दोन्ही बाजूंना नाजूक सोन्याचे ब्रोच असलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.
मंगळसूत्र निवडताना त्याचे पेंडट डिझाईन आकर्षक असावी यासाठी तुम्ही पेंडंटवर फुलांचे आणि पानांचे नाजूक नक्षीकाम असलेले मंगळसूत्र निवडू शकता.
मराठमोळ्या लूकवर पारंपारिक ठुशी स्टाईल काळ्या मण्यांचे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. खास नऊवारी साडीवर हे मंगळसूत्र उठून दिसते.
मंगळसूत्रामध्ये निळ्या-हिरव्या खड्यांचा वापर करून तयार केलेले मोराच्या आकाराचे पेंडंट सदाबहार आणि आकर्षक असते.