बलात्कार प्रकरणात अटक, चाकणकरांचा खरातसोबतचा फोटो समोर, सुषमा अंधारे म्हणाल्या अशा लिंगपिसाट माणसाला...

Nashik Astrologer Ashok Kharat Arrest Rape Case: नाशिक पोलिसांनी स्वयंघोषित ज्योतिष अशोक खरात उर्फ कॅप्टनला बलात्कार प्रकरणात अटक केली. पेनड्राईव्हमधून ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले असून राजकीय नेत्यांचे संबंधही चर्चेत आले आहेत.
Ashok "Captain" Kharat, the self-proclaimed astrologer, under police custody in Nashik amid rape allegations and political controversy.
Ashok "Captain" Kharat, the self-proclaimed astrologer, under police custody in Nashik amid rape allegations and political controversy.Saam Tv
Published On

नाशिक: गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या अनेक राजकीय नेते मंडळींचे हात बघून भविष्य सांगणाऱ्या नाशिकच्या अशोक उर्फ कॅप्टन खरात याच्याच हातात बेड्या पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदुगिरी करणाऱ्या एका मांत्रिकाला नाशिकच्या क्राइम ब्रांच युनिट 1 ने अटक केली आहे. या भोंदूबाबाला आज नाशिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. या मांत्रिकाने गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेनड्राइव्हमधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ देखील आढळले आहे. या भोंदूबाबकडे अनेक दिग्गज राजकीय नेते, अधिकारी आणि सेलिब्रिटी आपले भविष्य बघण्यासाठी जात असायचे. यामुळे राजकीय वर्तुळात देखील मोठी खळबळ उडाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अशोक खरातने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. यावरच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत जोरदार प्रहार केला आहे.

Ashok "Captain" Kharat, the self-proclaimed astrologer, under police custody in Nashik amid rape allegations and political controversy.
Sambhajinagar Politics: भाजपची खेळी! शिंदेसेनेला सतेतेपासून दूर ठेवलं; ठाकरेंच्या २ सदस्यांना फोडलं

रूपाली चाकणकरांच्या छत्रछायेखाली…..

कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली खरात याच्यावर बलात्कार योन शोषण यासारखे आरोप आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर तटकरे चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे समोर आली आहे.

Ashok "Captain" Kharat, the self-proclaimed astrologer, under police custody in Nashik amid rape allegations and political controversy.
Uddhav Thackeray | निरगुडे यांच्यावर कुणाचा दबाव होता?- उद्धव ठाकरे यांचा सवाल

अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योगसुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत. विशेष यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले. तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता. विशेष; खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने आवभगत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते. आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे, पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार ?

कारण अशा भामट्या ज्योतिष्यासाठी स्वतः छत्री घेऊन चाकणकर उभ्या आहेत...! योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजित आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंग पिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे...? असा जोरदार हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com