Manoj Jarange Patil : गिरीश महाजनांचे रेकॉर्डिंग, शूटिंग आहे, राज्यभर व्हायरल करू; मनोज जरांगे पाटील यांचा महाजनांना इशारा

Jalgaon News :पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश आणि विदर्भातील मराठा एक होत नाही; अशी शंका राज्यात होती आणि ती पसरवली जात होती. पण खानदेशातील मराठा एक आहे हे दिसून आले
Manoj Jarange Patil GIrish Mahajan
Manoj Jarange Patil GIrish MahajanSaam tv
Published On

जळगाव : गिरीश महाजन हे आंतरवलीमध्ये येऊन वेळ मागून घेऊन गेले होते. त्यांनी आता वेगळी विधानं करू नयेत. (Jalgaon) मराठा समाजाला नडू नये. आंतरवाली येथे भेटीदरम्यान ते काय बोलले होते त्याचं रेकॉर्डिंग, शूटिंग सगळं आहे. राज्यभरात व्हायरल करू. संकटमोचक आहेत म्हणून त्यांच्यावर विश्वास होता म्हणून मंचावर येऊ दिलं. त्यांनी फडणवीस साहेबांचं नाव खराब करू नये; असा  इशाराच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिला आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे पाटील हे खानदेश दौऱ्यावर होते. यात ते जळगावात आले असता त्यांनी मराठा आरक्षणावरून गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश आणि विदर्भातील मराठा एक होत नाही; अशी शंका राज्यात होती आणि ती पसरवली जात होती. पण खानदेशातील मराठा (Maratha Aarkshan) एक आहे हे दिसून आले. विदर्भात देखील ते आज दिसेल, असे जरंगे पाटील यांनी म्हटले आहे. 

Manoj Jarange Patil GIrish Mahajan
Chandrashekhar Bavankule News : काँग्रेसला बुथवर बसायला माणूस ठेवू नका; चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना सूचना

समाज व्यसनपासून दूर गेला पाहिजे. जात वगैरे सोडून द्या माणूस म्हणून आपण विचार केला पाहिजे. तुमच्याकडे शेतीची परिस्थिती भयानक आहे. त्यात व्यसन असेल तर जगायचं कसं? त्यामुळे व्यसन न करण्याचे आवाहन करतो. 

Manoj Jarange Patil GIrish Mahajan
Nandurbar News : अवैध गुटखा विक्रीची दुकाने सील; दहा लाखांपेक्षा अधिकचा गुटखा जप्त

२४ तारखेच्या आत निर्णय घ्यावा
मराठा आरक्षणाबाबत २४ तारखेच्या आत निर्णय घ्यावा. खानदेश आणि विदर्भातील मराठ्यांची एकजूट बघून तरी निर्णय घ्यावा. त्यापूर्वी १७ तारखेला अंतरवाली येथे महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांची बैठक होईल. उपोषणकर्ते, साखळी उपोषणकर्ते सगळ्यांनी या बैठकीला यावं असं आवाहन त्यांनी केले. मराठवाड्यात अभ्यासक कमी आहेत त्यामुळे कमी नोंदी सापडल्या आहेत. यासाठी मनुष्यबळ वाढवावं.

कायदा पारित करून घ्या 
मराठा आमदार आवाज उठवत नाहीत. महाराष्ट्रातील सगळ्या मराठा आमदारांना आवाहन करतो. विषय लावून धरा आणि कायदा पारित करूनच घ्या. सरकारवर दबाव आणा. सरकारमधील आणि विरोधी दोन्ही कडच्या आमदारांनी आवाज उठवा. सगळ्या पक्षातील आमदारांना आणि विशेषतः मराठा समाजातील आमदारांनी एकत्र येऊन कायदा पारित करून घ्या. तुम्ही हे केलं तर आयुष्यभर मराठा समाज तुम्हाला विसरणार नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com