सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात बंदी असलेल्या गुटखा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात अन्न औषध प्रशासनाचे विशेष मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. या कारवाई दरम्यान (Nandurbar) किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करत जिल्हाभरातून जवळपास दहा लाखांपेक्षा अधिकचा गुटखा जप्त केला आहे. (Police) तर अवैध गुटखा विक्री करणारे दुकाने सील काण्याची कारवाई केली आहे. (Breaking Marathi News)
नंदुरबार जिल्हा हा गुजरात राज्याचा सीमावरती भागात आहे. गुजरातमधून नंदुरबार जिल्ह्यात राज्यात बंद असलेल्या गुटख्याचे मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. विक्रीही केली जात असते. यासंदर्भात राज्याच्या औषध प्रशासन विभागाकडे (FDA) तक्रारी करण्यात आल्या होत्या. तक्रारींची दखल घेताना औषध प्रशासन विभागाच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून जिल्हाभरात धाडसत्र राबवले जात आहे
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गुटखा विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली जात असून आतापर्यंत नंदुरबार, नवापूर, शहादा तालुक्यात कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास दहा लाख रुपयाचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आले आहे. गुटख्याच्या विरोधात कारवाई सत्र सुरू राहणार असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.