wardha  Saam tv
महाराष्ट्र

Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

Wardha Rain update : वर्ध्यातील मुसळधार पावसाचा फटका डंभारे कुटुंबाला बसला आहे. मुसळधार पावसामुळे त्यांचं घर कोसळल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

वर्ध्यातील सावली वाघ या भागात मुसळधार पावसामुळं एका कुटुंबाचं घर कोसळलं.

श्रीराम डंभारे आणि त्यांची वृद्ध आई दुर्घटनेतून सुदैवाने वाचले.

या घटनेने कुटुंबावर स्नानगृह आणि शौचालयात राहण्याची वेळ आली आहे.

डंभारे कुटुंबाला प्रशासनाकडून अद्याप मदत मिळालेली नाही.

चेतन व्यास, साम टीव्ही

वर्धा : मुसळधार पावसाने वर्ध्यात राहणाऱ्या लोकांची दैना झाली आहे. वर्ध्यातील एका कुटुंबाला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यांचं पावसामुळे घर कोसळल्यामुळे स्नानगृह आणि शौचालयात राहण्याची वेळ आली आहे. या दुर्घटनेतून सुदैवाने वृद्ध आई आणि मुलगा बचावला आहे.

मागील दोन दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत आहे. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झालीय. अशातच हिंगणघाट तालुक्यातील सावली वाघ येथे घर कोसळल्याने वृद्ध आईसोबत मुलाला घरातील स्नानगृह आणि शौचालयात राहण्याची वेळ आली आहे. शनिवारी दुपारी चार वाजता दरम्यान घर कोसळलं असून तातडीने मदतीची मागणी करण्यात आली आहे.

सावली वाघ येथील श्रीराम डंभारे हे आपल्या वृद्ध आईसोबत येथे राहतात. रोजमजुरी करणाऱ्या श्रीरामची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याचे घर कच्चे आहे. दोन दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे आज शनिवारी चार वाजता अचानक घर कोसळत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने श्रीरामने आपल्या आईला बाहेर काढले यामुळे मोठी घटना टळली.

श्रीरामाचं पूर्ण घर पडल्याने त्याला आईसोबत घरातील स्नानगृह आणि शौचालयात राहण्याची वेळ आली आहे. दुपारपासून घडलेल्या घटनेची अद्याप कोणी दखल घेतली नाही, तसेच अद्याप कोणी घटनास्थळी भेट दिली नाही.प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देत या कुटुंबाला मदत करण्याची मागणी सावली वाघ येथील नागरिकांनी केली आहे.

वर्ध्यात नेमकं कुठे दुर्घटना घडली आहे?

वर्ध्यातील सततच्या मुसळधार पावसामुळे हिंगणघाटमधील सावली वाघ गावात एक घर कोसळले.

घरात कोण राहत होते?

श्रीराम डंभारे आणि त्यांची वृद्ध आई दोघे घरात राहत होते.

अपघातात कुणी जखमी झाले का?

दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही, श्रीराम यांनी वेळीच आईला बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Puri Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट तयार करा चटपटीत दही पुरी रेसिपी

Cotton Saree Contrast Blouses: साध्या कॉटन साडीला स्टायलिश लूक देणार 5 कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाईन

Maharashtra Live News Update : रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम

India Travel : भारतातील या ठिकाणी घ्या हाऊसबोट्समध्ये राहण्याचा शानदार अनुभव, जाणून घ्या ठिकाणे

Makar Sankranti: यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरु नयेत? महिलांसाठी खास सुचना...

SCROLL FOR NEXT