चेतन व्यास
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या शिवसेनेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नवनियुक्त जिल्ह्याचे संपर्क प्रमुख निलेश धुमाळ (Wardha) यांच्या विरोधात बहुतांश आजी व माजी पदाधिकाऱ्यांनी मूठ बांधत त्यांना हटविण्याची मागणी केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत तसा ठराव देखील करण्यात (Shiv Sena) आला आहे. एकीकडे सर्वच पक्ष हे लोकसभेच्या तयारीला लागले आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या संपर्क प्रमुखांच्या कार्याप्रणामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसत आहे. (Breaking Marathi News)
वर्धेच्या समुद्रपूर येथे सहसंपर्क प्रमुख रविकांत बालपांडे यांच्या अध्यक्षतेत आजी व माजी पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत धुमाळ यांना हटविण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आला आहे. हा ठराव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठविला. संपर्क प्रमुख निलेश धुमाळ हे जिल्ह्यात आर्थिक व्यवहार करून पद वाटप करत आहेत. त्यांनी इतर पक्षाची सुपारी घेऊन शिवसेना ठाकरे गटाच खच्चीकरण जिल्ह्यात सुरु केल्याचा आरोप यावेळी लावण्यात आला. संपर्क प्रमुखांच्या विरोधात जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी असल्याने जिल्ह्यातील ठाकरे गट आता अंतर्गत वादात अडकलेले दिसत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काही दिवसांपूर्वी देवळी येथे सुद्धा काही पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा देत धुमाळ यांना हटविण्याची मागणी केली होती. आता समुद्रपुरात जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख रविकांत बालपांडे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर, माजी जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांच्यासह वर्धा व हिंगणघाट विभागाचे आताचे जिल्हाप्रमुख बाळू मीरापूरकर, उपजिल्हाप्रमुख प्रमोद भटे, राजेंद्र खुपसरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठराव घेत हटविण्याची मागणी केली. या बैठकीला शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.