अमली पदार्थाची विक्री करणारे नवनवीन शक्कल लढवत असतात. अशातच वर्धामधील हिंगणघाट येथे एकाने गांजा या अंमलीपदार्थची झाडे चक्क घराच्या छतावर लावलीत. झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी याप्रकरणी तरुणाला अटक केलीये. तसेच गांजाची दोन ते अडीच फूट उंचीची ४२ झाडं जप्त केलीत.
हिंगणघाट पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून आकीब (३१) रा. जगन्नाथ वॉर्ड हिंगणघाट, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आकीब याने घराच्या छतावर गांजा अमली पदार्थाचे हिरवे, ओले अशी दोन ते अडीच फूट उंचीची ४२ झाडे लावली होती.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी आकीबच्या निवासस्थानी छापा मारला. यावेळी ३६९ ग्रॅम वजनाची ४२ झाडे असा ४,५०० रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करुन गुन्हा दाखल केला.
410.53 कोटी रुपयांचे 844 किलो अमली पदार्थ केले जप्त
अमली पदार्थांबाबत दोन महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी देखील मोठी कामगिरी केली होती. अमली पदार्थ बाळगण्याच्या 1,260 प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या 1,546 जणांना अटक करण्यात आली होती. जप्त केलेल्या अमली पदार्थांची एकूण किंमत 410.53 कोटी रुपये इतकी होती.
एमडी हे मुंबईतील सर्वात जास्त सेवन केले जाणारे ड्रग्ज आहे, असे मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने दिलेली आकडेवारी सांगते. सेलने गेल्या वर्षी 133 जणांविरुद्ध एमडीचाचे सेवन आणि विक्री केल्याप्रकरणी 62 गुन्हे दाखल केलेत. अटक केलेल्यांकडून 282.984 कोटी रुपयांचे 14 किलोग्रॅम एमडी जप्त करण्यात यश आले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.