Instagram युजर्सच्या कामाची बातमी! आता चॅट्सची प्रायव्हसी संपणार, मेटानं घेतला मोठा निर्णय

Instagram New Update News : इंस्टाग्रामच्या प्रायव्हसी पॉलिसीत ८ मे पासून बदल होणार असून युजर्सच्या खाजगी चॅटिंगवर त्याचा परिणाम होऊ शकतो. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फीचरबाबत मेटाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Instagram युजर्सच्या कामाची बातमी! आता चॅट्सची  प्रायव्हसी संपणार, मेटानं घेतला मोठा निर्णय
Instgram Message End To End Encryption ChangesSaam Tv
Published On
Summary
  • इंस्टाग्राममध्ये ८ मे २०२६ पासून प्रायव्हसी पॉलिसीत बदल

  • चॅट्स पूर्वीसारखे पूर्णपणे खासगी राहणार नाहीत

  • मेटाने एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फीचरबाबत निर्णय घेतला

Instgram Message End To End Encryption Changes इंस्टाग्राम युजर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या ८ मे पासून इंस्टाग्राममध्ये मोठा बदल होणार आहे. मेटाच्या फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवरील खाजगी चॅट यापुढे खाजगी राहणार नाहीत. युजर्सच्या प्रायव्हसीचे संरक्षण करण्यासाठी काही वर्षांपूर्वी लाँच करण्यात आलेले एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फीचरबाबत कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.

आपण दिवसातून बरेच तास मोबाईल वापरतो. त्यापैकी सर्वाधिक जास्त वेळ हा आपला सोशल मीडिया वापरण्यात जातो. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरताना सर्वात महत्त्वाची असते प्रायव्हसी. या प्रायव्हसीबद्दल वापरकर्ते कायम जागरूक असतात. विशेषत: जेव्हा पर्सनल चॅटचा विचार केला जातो, तेव्हा प्रत्येक युजर्सची इच्छा असते की त्याचे चॅट्स केवळ त्याच्यापुरते मर्यादित असावे.

Instagram युजर्सच्या कामाची बातमी! आता चॅट्सची  प्रायव्हसी संपणार, मेटानं घेतला मोठा निर्णय
Accident News : बाइकवरून निघाले, शाळेसमोरच्या रस्त्यावरच अघटित घडलं; जेसीबीच्या धडकेत २ तरुणांचा मृत्यू

मात्र मेटाने आपल्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे की, ८ मे २०२६ नंतर Instagram वर पाठवलेले मेसेज पूर्वीसारखे पूर्णपणे खासगी नसतील. कंपनी आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये असा बदल करणार आहे, ज्यामुळे युजर्सच्या चॅटिंगबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे.आता याचा फटका इंस्टाग्राम युजर्सना बसणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Instagram युजर्सच्या कामाची बातमी! आता चॅट्सची  प्रायव्हसी संपणार, मेटानं घेतला मोठा निर्णय
Nagpur : गणित चुकलं म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण, शिक्षकांची पालकांनाही धमकी, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन म्हणजे काय?

इंस्टग्रामने डिसेंबर २०२३ मध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फीचर्स आणले होते. जेणेकरून युजर्सचे खाजगी चॅट पूर्णपणे सुरक्षित राहतील. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन या फीचरमुळे दोन व्यक्तींमधील संभाषणे तिसऱ्या व्यक्तीद्वारे वाचली जाऊ शकत नाहीत. तसेच प्लॅटफॉर्म चालवणारी कंपनीदेखील त्या चॅटमध्ये प्रवेश करू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com