'बाबासाहेब जर अजून जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते.', असं मोठं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. वक्फ विधेयक, मुस्लिम समाज, औरंगजेबाची कबर या देशामध्ये सध्या गाजत असलेल्या सर्व मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत असताना रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत हे मोठं विधान केले. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे.
रामदास आठवले यांनी वक्फ विधेयकावर प्रतिक्रिया देत असताना विरोधकांवर निशाणा साधला. 'केंद्र सरकारने वक्फ विधेयकात केलेले बदल हे मुस्लिम विरोधी नाही. तर मुस्लिमांना सदन करण्यासाठी आहे. मात्र विरोधकांकडून सातत्याने यासंदर्भात मुस्लिम समाजात गैरसमज निर्माण केले जात असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे.' असा गंभीर आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.
तसंच, 'जम्मू काश्मीरमध्ये ९९ टक्के दहशतवादी हल्ले कमी झाले त्यामुळे सद्यस्थिती खूप शांतता आहे. काँग्रेसच्या काळात ३७० कलम हरवले असते तर अजून जम्मू काश्मीरमध्ये जास्त विकास झाला आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्ष मुस्लिमांना भडकवत आहे. मात्र भाजप किंवा एनडीए हा मुस्लिमांच्या विरोधात नाही. औरंगजेबाच्या कबरीचा वाद हा छावा चित्रपट पहिल्यानंतर वाद समोर आला. मात्र शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव होते.' असे रामदास आठवले यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबाबत प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले की, 'सर्व धर्मांमध्ये बंधू भाव वाढविण्यासाठी संविधान आहे आणि हा वाद जास्त वाढू नये असे माझे मत आहे. संविधान तयार करण्यात सर्वांचे योगदान होते. मात्र पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी स्वतः म्हटले आहे की, तुम्ही संविधानाचे शिल्पकार आहात. बाबासाहेब जर अजून जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते.'
तसंच, 'बौद्ध गयाचे जे आंदोलन सुरू आहे. तर आमची मागणी आहे की, मंदिरात जसे आमचे लोक नाही तर बुद्ध विहार आमच्या ताब्यात द्यावे. अशी मागणी आमची आहे. यासंदर्भात मी नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. नितीश कुमार यांना देखील भेटून मी आमची आग्रही मागणी केली आहे.', असे रामदास आठवले यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना रामदास आठवले यांनी सांगितले की, 'लाडकी बहीण २१०० रुपये असो की कर्जमाफी ही मागणी आम्ही नाकारली अशी नाही. मात्र टप्प्याने पूर्ण करू. कारण राज्याची आर्थिक स्थिती नाही.'
राज ठाकरे यांच्या मराठीच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले की, 'मान्यता रद्द करू नये मात्र आम्ही राज ठाकरे यांच्या भूमिकेशी मी सहमत नाही. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. अनेकांना सर्वांना सावरण्याचे काम मुंबईने केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी जावू नये. ते दोन तीनदा जाऊन आले आहे. मुंबई बदनाम करून इकॉनॉमी कमी करण्याचे काम आहे. ही भूमिका अयोग्य आहे. मनसेने विकासाबद्दल बोलले पाहिजे. अशी दादागिरी करणं योग्य नाही. बँकांमध्ये अशा पद्धतीने मराठीचा आग्रह करणे चुकीचे आहे.', असे मत त्यांनी व्यक्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.