Maharashtra Politics
Maharashtra Politics

Maharashtra Politics : राज्यसभेत धुमशान, राऊत-पटेल भिडले; औकातीचा वाद दलालीपर्यंत गेला

Maharashtra Politics News : राऊतांनी बाप काढला.. 'पटेल, नागडा करीन' पटेलांचे बाण, राज्यसभेत धुमशान..रंगावरुन नडले, राऊत-पटेल भिडले.. औकातीचा वाद दलालीपर्यंत गेला, राऊतांचाही टोला
Published on

Sanjay raut News : वक्फ विधेयकावरुन राज्यसभेत प्रफुल्ल पटेलांनी संजय राऊतांना डिवचलंय आणि वादाची ठिणगी पडली... राज्यसभेत नेमकं काय घडलं? त्यावर राऊतांनी काय प्रतिक्रीया दिलीय? आणि या वादामागे नेमकं काय राजकीय गणित आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

वक्फ सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊत यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली... प्रफुल्ल पटेलांनी बाळासाहेब ठाकरे आणि मुंबई दंगलीचा उल्लेख करत संजय राऊतांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.. एवढंच नाही तर राऊत रंग बदलणारे असल्याचा टोला लगावला..त्यावर संतापलेल्या राऊतांनीही पलटवार केलाय...

Maharashtra Politics
Nagpur Crime : नागपूर की वासेपूर, भाजीच्या ठेल्यावरुन खुलेआम गोळीबार

प्रफुल्ल पटेलांची टीका चांगलीच जिव्हारी लागल्याने राऊतांनी थेट पटेलांना नागडा करण्याची भाषा केलीय... तर राऊतांच्या इशाऱ्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी अंगूर खट्टे है म्हणत पुन्हा एकदा राऊतांना डिवचलंय...त्यामुळे प्रफुल्ल पटेल विरुद्ध संजय राऊत हा वाद आगामी महापालिका निवडणूकीपूर्वीच्या वातावरण निर्मितीसाठी आहे का? याचीच चर्चा रंगलीय... मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्पष्टपणे वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने तर ठाकरे गटाने विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतल्याने अल्पसंख्यांक मतांचं विभाजन होणार का? याकडे लक्ष लागलंय...

Maharashtra Politics
Maharashtra Politics : वक्फवरून संजय राऊत दिल्लीत तुटून पडले; महाराष्ट्रात भाजप आमदार कडाडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com