Ramdas Athawale : 'राज ठाकरे महायुतीत आले, तर आम्हाला काहीच..' रामदास आठवले नेमकं काय म्हणाले? वाचा

Maharashtra Politics : मनसे महायुतीत येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी 'राज ठाकरे यांनी महायुतीत येऊ नये', असे म्हटले आहे. ते असं का म्हणाले? जाणून घ्या..
Ramdas Athawale Raj Thackeray
Ramdas Athawale Raj ThackeraySaam Tv
Published On

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री आणि आरपीआय पक्षाचे नेते रामदास आठवले नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांनी केलेल्या महायुतीशी संबंधित वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. 'महायुतीत आम्हाला काही मिळत नाही. राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर आम्हाला अजून काही मिळणार नाही' असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड येथे रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना महायुतीने मला डावललं असे उद्गार काढले. मनसे महायुतीत येणार असल्याच्या चर्चांवर रामदास आठवले यांनी भाष्य केले. 'राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. पण त्यांनी महायुतीत येऊ नये', असे रामदास आठवले म्हणाले.

सध्या राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष महायुतीत येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यावर बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी 'महायुतीत आम्हाला आधीच काही मिळत नाही. राज ठाकरे जर महायुतीमध्ये आले तर आम्हाला काहीच मिळणार नाही. तेव्हा त्यांनी महायुतीत येऊ नये', असे वक्तव्य केले.

Ramdas Athawale Raj Thackeray
Suresh Dhas : 'लोकशाही नाही तर ठोकशाहीच्या मार्गाने..' परळीत काळे झेंडे दाखवल्यावर काय म्हणाले सुरेश धस?

'लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीने मला डावलले. मात्र मी महायुतीला डावलले नाही. त्यांना ज्याप्रकारे आपल्या पक्षातील नेते आणि कार्यकर्ते सांभाळावे लागतात, अगदी त्याप्रकारे मला देखील माझे कार्यकर्ते सांभाळावे लागतात. तेव्हा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडुकीत आम्हाला जागा देण्यात याव्याट, असे रामदास आठवले म्हणाले आहेत.

Ramdas Athawale Raj Thackeray
Chhaava : 'छावा'च्या दिग्दर्शकांनी मागितली शिर्के वंशजांची माफी, त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com