Uddhav Thackeray Saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : बॅग तपासण्यावरुन घमासान, उद्धव ठाकरे भडकले; हेलिपॅडवर नेमकं काय घडलं? पाहा स्पेशल रिपोर्ट

Uddhav Thackeray in Yavatmal : उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासण्यावरून राजकारण तापलं आहे. निवडणूक आयोगाने बॅग तपासल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच भडकले.

Vishal Gangurde

मुंबई : यवतमाळच्या वणीच्या हेलिपॅडवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासण्यात आल्या. यावेळी उद्धव ठाकरे निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर संतापल्याचं पाहायला मिळाले. यावेळी ठाकरेंनी निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. या सगळ्या प्रकाराबाबत ठाकरेंनी वणीच्या सभेत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला..काय घडलं पाहूया...

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला असताना निवडणूक कर्मचा-यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्यामुळे मोठं वादळ उठलंय. यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीत सभा घेण्यासाठी उद्धव ठाकरे हेलिपॅडवर उतरले. मात्र या ठिकाणी काही नाट्यमय घडामोडी घडल्या...उतरल्या उतरल्या निवडणूक कर्मचा-यांनी त्यांच्या थांबवलं. उद्धव ठाकरेंसाठी हे अनपेक्षित होतं. त्यांनी कर्मचा-यांना विचारलं असता...बॅगा तपासायची असल्याचं कर्मचा-यांनी सांगितलं. या हेलिपॅडवर नेमकं काय घडलं ते पाहूयात.

या घटनेनंतर वणीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. मोदी आणि शाहांच्या बॅगा तपासणार का असा सवाल ठाकरेंनी केला. यावेळी ठाकरेंनी निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर मविआतील घटक पक्षांनीही या प्रकारावर निषेध व्यक्त करत टीका केलीय.

गेल्याच आठवड्यात बीकेसीतील सभेला जात असताना त्यांच्या सुरक्षारक्षकाला अडवल्यानं उद्धव ठाकरे पोलिसांवर भडकले होते.यावेळीही त्यांनी पोलिसांची नावं लिहून घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. अशीच घटना लोकसभेत शिंदेंसोबत घडली होती.

संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हेलिकॉप्टरमधून नाशिकला पैसे नेल्याचे आरोप केले होते. त्यानंतरच्या नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची बॅग तपासण्यात आली होती. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कोट्यावधींचं घबाड गाड्यांमधून मिळत असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी नेत्यांची बॅग तपासली तर कुणाला राग येण्याचं कारण नाही.. मात्र सर्वांसाठी सारखा नियम असला तर मग मतदारांमध्ये निष्प:क्ष निवडणुकीचा संदेश जाण्यास मदत होईल एवढंच.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावित होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवळे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : राम शिंदे पराभवाचा वचपा काढणार की रोहित पवार पुन्हा आमदार होणार? एक्झिट पोल काय सांगतो?

Samosa Recipe: नाश्त्यासाठी १० मिनिटांत बनवा हॉटेलसारखा खुसखुशीत समोसा

IND vs AUS: पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियामध्ये मोठा फेरबदल, अचानक 'या' खेळाडूची संघात एन्ट्री!

SCROLL FOR NEXT