मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे उद्धव ठाकरे प्रचारसभा घेत आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरेही महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आदित्य ठाकरेंकडून जाहीर सभेत महायुतीवर हल्ले चढवले जात आहे. आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर शिंदे गट आघाडीवर आघाडीवर आहे. आदित्य ठाकरेंनी आळंदीतील भाषणातूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर तुफान टीका केली.
पुण्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 'आम्हाला राजकारणातून यांना संपवायचं आहे, असं वाटलं. अगदी उद्या हे ठाकरे आडनाव लावूनही फिरतील. एकवेळ असा विचार करा, आम्ही राजकारणातून बाहेर झालो. पण एकतरी उद्योग राज्यात आणून दाखवायचा ना? असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली.
बडोद्यातील रोड शोवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'बडोद्यामध्ये नेमका रोड शो कशासाठी काढला. नरेंद्र मोदी सांगतील का? देतील का याचं उत्तर? तिथं कोणतीही निवडणूक ही नाही. महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून, तरुणांचे रोजगार पळवून एअर बस प्रकल्प तिकडे नेल्याचा आनंद मोदींनी साजरा केला.
लाडका भाऊ योजनेवरून महायुतीवर टीका करताना ठाकरे म्हणाले, 'गौरी लंकेश यांच्या हत्या करणाऱ्याला महायुतीने पक्षात घेतलं. महिला पत्रकाराला तुझा बलात्कार झाला का? असा प्रश्न विचारणाऱ्यांना तुम्ही तुमचे लाडके भाऊ समजणार का? तुम्ही दीड हजार रुपयांसाठी त्यांना मत देणार का? भाजप मोठी जादूगार आहे. 2014 सालामधील 15 लाखांचे 2024 मध्ये 1500 झाले. 2014 मध्ये हीच भाजपा 15 लाख रुपये देणार होती. भाजप खूप मोठी जादूगार आहे. आता डोळे मिटा आणि उघडा. आता 2024 मध्ये 15 लाखाचे किती झाले? पंधराशे रुपये. विचार करा'.
आदित्य यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली. 'शेती कशी करावी, मुख्यमंत्र्यांकडून शिका. ते थेट हेलिकॉप्टर मधून शेतात पोहोचतात. शेतकऱ्यांनो सांगा, तुम्ही किती वर्षांपासून शेती करताय. पण तुम्ही कधी हेलिकॉप्टरमधून शेतात गेलात का? नाही, मग तुम्ही कसली शेती करताय. तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून शिका, ते बघा नेहमी हेलिकॉप्टरमधून थेट शेतात जातात, अशी टीका ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली.
दरम्यान, या सभेत आदित्य ठाकरेंनी अजित पवारांवर बोलणं टाळलं. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाचे बाबाजी काळे यांच्यात थेट लढत होत आहे. यावेळी काळेंच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरेंनी आळंदीत सभा घेतली. मात्र आदित्य ठाकरेंचा निशाणा शिंदे फडणवीसांवर ठेवत अजित पवारांवर बोलणं टाळलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.