CM Eknath Shinde News : उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत आग लावणारी; एकनाथ शिंदे यांचा धाराशिवातून घणाघात

Maharashtra Politics : महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी धाराशिव मधील परांडा येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं.
CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde NewsSaamTV
Published On

उद्धव ठाकरे यांची मशाल क्रांतीची नसून घराघरांत आग लावणारी आहे, त्यांनी अडीच वर्षांत फक्त विकास कामांना स्टे देण्याच काम केल, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शुक्रवारी (दि. ८) महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी देण्याचे संकेत दिले आहेत. 'तानाजीरावांना तुम्ही आमदार करा, नामदार करायची जबाबदारी माझी', असा शब्द एकनाथ शिंदे यांनी परंडा येथील जाहीर सभेतून दिल्याने महायुतीचं सरकार आल्यावर तानाजी सावंत यांची पुन्हा मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार विकायला निघाले तेव्हा आम्ही उठाव करण्याचं धाडस केलं, त्यावेळी तानाजीराव माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते. बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे. उस्मानाबादच नामकरण धाराशिव करण्याच भाग्य मला मिळालं. पुर्ण बहुमताचं सरकार आणल्यावर आम्ही अधिकृतपणे उस्मानाबादच धाराशिव आणि औरंगाबादच छञपती संभाजीनगर असं नामकरण करून बाळासाहेबाचं स्वप्न पूर्ण करायच काम केलं आहे, असंही शिंदे म्हणाले.

CM Eknath Shinde News
Amit Shah : राहुल गांधींची चौथी पीढी आली तरी...; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगलीतून काय इशारा दिला?

आपल्या भाषणातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Udhav Thackarey) यांच्यावर देखील टीकेची झोड उठवलेली बघायला मिळाली. 'धनुष्यबाण आमचा आहे, असं म्हणणाऱ्यांनी आपली मशालसुद्धा आता दुसऱ्याच्या हातात देऊन टाकली आहे. ठाकरेंची मशाल ही क्रांतीची मशाल नाही, ती घराघरात आग लावणारी मशाल आहे', अशी घणाघाती टीका शिंदेंनी यावेळी आपल्या भाषणातून केली. तसंच गेल्या अडीच अडीच वर्षांच्या काळातील मविआ आणि महायुतीने केलेली कामं जनतेने बघावी, त्यांनी अडीच वर्ष फक्त कामांना स्टे दिला. आम्ही आमच्या कार्यकाळात राज्याचा विकास केला. परंडा येथील किल्लेदार तानाजी सावंत यांची प्रचारसभा, ही विजयाची सभा आहे. त्यांचा नाद करायचा नाही, तानाजीराव जादूगार आहेत, ते जादू करतात.

CM Eknath Shinde News
PM Narendra Modi : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार; PM मोदींचा गंभीर आरोप

परंडा येथील जनतेच्या मनात काय आहे. परंडा येथील जनतेच्या मनात काय आहे, हे गर्दीने ठरवलेलं आहे. हा एकनाथ शिंदे 23 तारखेला परांड्यात फटाखे फोडायला येतो आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना विजयी करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. दरम्यान, परांडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे राहुल मोटे निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर त्यांच्याविरोधात महायुतीचे तानाजी सावंत हे निवडणूक लढवणार असल्याने या दोघांमध्ये लढत रंगणार आहे.

CM Eknath Shinde News
Maharashtra Election : शरद पवार खमक्या माणूस; महायुतीच्या स्टेजवरच रामदास आठवलेंकडून कौतुकवर्षाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com