संजय राठोड, साम टीव्ही
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. उद्धव ठाकरेंनी राज्यभरात प्रचाराचा धडाका लावला आहे. आज उद्धव ठाकरे यवतमाळमध्ये हेलिकॉप्टरने रवाना झाले होते. ठाकरेचं हेलिकॉप्टर वणीच्या हेलिपॅडवर आल्यानतंर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगाची झडती घेतली. या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमधील प्रचारसभेत महायुतीवर जोरदार निशाणा साधला.
मी हेलिकॉप्टरने आलो. त्यानंतर आठ ते दहा जण माझ्या स्वागतासाठी उभे होते. त्यानंतर ते म्हणाले बॅग तपासायच्या आहेत. त्यांना म्हटलं तपासा. त्यांचे व्हिडिओ काढले.
तुम्हाला चौकशीसाठी कुठे अडवलं. तुमच्या बॅगा तपासल्या. तर तुम्हाला त्यांचे ओळखपत्र तपासण्याचा अधिकार आहे. त्यांचे अपॉइंटमेंट लेटर तपासा. तुमचे खिसे तपासल्यानंतर त्यांचेही खिसे तपासा. हा आपला अधिकार आहे. मतदाराचा मुलभूत अधिकार आहे. मी त्यांच्यावर रागावलो नाही.
माझी बॅग तपासली. तशी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची बॅग तपासली का? तपासायला हवी की नको?
दाढीवाल्या, जॅकेटवाल्यांची बॅग तपासायला हवी का नको? नरेंद्र मोदी, शहा यांना सांगतो, वेडीवाकडी आव्हान करू नका. कापसाची खरेदी नाही. सोयाबीनला भाव नाही.
लाडकी बहीण, लाडकी बहीण... ते येथील आहेत. त्या गुजरातहून आल्या नाहीत.
आपलं सरकार आल्यावर 1500 नाही 3000 देऊ. रोजगारामध्ये महाराष्ट्र सर्वोत्तम करून दाखविणार आहे.
आम्ही शेतकरी कर्जमुक्त करणार आहोत. मी कर्जमाफी करून दाखवली आहे. शेतकऱ्यांच उत्पन्न डबल करणार आहे. रोजगार उपलब्ध करून देईल. भावाला 15 लाख देणार होते, त्याचे 1500 का झाले?
लोकसभामध्ये तुम्हाला धडा शिकवला आहे. देशाचे पंतप्रधान विश्वगुरु यांचे भाषण म्हटलं तर, उद्धव ठाकरेंवर बोलल्या शिवाय पूर्ण होत नाही.
अमित शहा हे माझ्या नावाशिवाय भाषण बोलत नाही. एक न्यायमूर्ती तिकडे होते, न्याय दिला नाही भाषण दिले. म्हणाले, राम मंदिराचा निर्णय घेताना मला घेता येत नव्हता. मग यमाई देवीकडे गेलो. आम्हाला सांगितले असते तर आम्ही यमाई देवीकडे गेलो असतो.
शिवसेना आपलीच आहे, माझ्या आजोबांनी नाव ठेवले आहे. निवडणूक आयोगाच्या आजोबाने नाव नाही ठेवलं. तारीख पे तारीख, आम्ही काय सनी देओल आहोत काय?
महाराष्ट्र लुटला जातोय, बेकारी होत आहे. ती थांबवणे, हमीभाव देणे, रोजगार देणे, महिला सुरक्षा देणे, जुनी पेन्शन देणे हे करायचं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.