VIDEO : शिवसेना फोडणाऱ्यांचं बाळासाहेबांवरचं प्रेम खोटं, राऊतांचा अमित शहांना खोचक टोला

Sanjay Raut Criticize Amit Shaha : व्यापारी आपला माल विकण्यासाठी खोटं बोलतो. स्वत:चा फायदा बघतो. बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा पक्ष चालणार नाही, त्यांच बाळासाहेबांवर खोटं प्रेम आहे, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे.

बाळासाहेबांवर आपलं इतकं प्रेम असतं तर बाळासाहेबांची शिवसेना आपण गैरमार्गाने फोडली नसती. बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष एक इंच पुढे सरकत नाही. तुमच्या पेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लोकं अधिक चांगली आहेत. त्यांना बाळासाहेबांविषयी अत्यंत आदर आहे, तुमच्यासारखं त्यांचं प्रेम ढोंगी नाही, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे. आपल्या सभेत अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपलं प्रेम असल्याचं वक्तव्य केलं होत. त्यावर सोमवारी राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच भाजपने आपल्या बॅनरवरून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हटवावा. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना विकली, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याची आवश्यकता नसल्याचं देखील यावेळी राऊत म्हणाले.

पुढे बोलताना राऊत यांनी म्हंटलं की, 'व्यापारी नेहेमी आपल्या फायद्यासाठी खोटं बोलत असतो. 370 कलम हटवून कश्मीरसाठी यांनी काय केलं, आजही कश्मीरमध्ये आपल्या जवानांच्या हत्या सुरू आहेत. ३७० हटवल्याने देशाचा किंवा काश्मीरचा काहीही फायदा झालेला नाही. काश्मीरमदये एकही रोजगार आलेला नाही. फक्त सगळ्या जमिनी गौतम अदानीसाठी मोकळ्या केल्या आहेत, असा आरोप देखील राऊत यांनी यावेळी अमित शहा यांच्यावर केला आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. सावरकांना भारतरत्न देणं हे अमित शहांच्या हातात असताना ते ही मागणी का पूर्ण करत नाहीत, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com