Dhananjay Mahadik : लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर येथील सभेत वादग्रस्त विधान केले. जर काँग्रेसची रॅली निघाली आणि या रॅलीमध्ये आपल्याकडून पंधराशे रुपये घेणाऱ्या महिला जर दिसल्या त्यांचे फोटो काढून घ्या नावे लिहून घ्या, व्यवस्था करतो... असं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी भरसभेत केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. काँग्रेस आणि आघाडीने महाडिक यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. महाडीक यांनी त्यानंतर यावर माफी मागितल्याचं समोर आलेय.
लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला संदर्भात धनंजय महाडिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये पैसे घेऊन काँग्रेस रॅलीत दिसणाऱ्या महिलांचे फोटो काढून पाठवा, त्यांची व्यवस्था करतो. कारण घ्यायचं आपल्या शासनाचे आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही, असे धनंजय महाडिक सभेत भाषण करताना म्हणाले होते.
महाराष्ट्रात अनेक महिला आपली छाती बडवत आहेत की आम्हाला सुरक्षा पाहिजे मग पैसे नकोत ? राजकारण करता या पैशाचं, काँग्रेसच्या सभेला जर या महिला दिसल्या तर त्यांचे फोटो काढा. काँग्रेसच्या रॅली महिला दिसल्या तर फोटो काढायचे फोटो आमच्याकडे द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो, असेही सभेत महाडिक म्हणाले. धनंजय महाडिक यांनी भर सभेत लाडक्या बहिणींना दम भरल्याची चर्चा कोल्हापूरमध्ये सुरु झाली.
भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याने राजकारण तापलेय. लाडकी बहीण योजनासंदर्भात बोलताना महाडिक यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. काँग्रेसकडून या वक्तव्याचा समाचार घेण्यात येत आहे.
आपल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्याचं समजताच महाडिक यांनी माफी मागत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. ज्यांना लाभ मिळाला नाही त्याना देण्याची माझी भूमिका होती, असं धनंजय महाडिक म्हणाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.