Chhagan Bhujbal News Update : 'ईडी मुक्तीसाठी भाजपबरोबर गेलो', भुजबळांनी दावे फेटाळले?

Chhagan Bhujbal Statement On Rajdeep Sardesai's Book : राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातून ईडी मुक्तीसाठी भाजपबरोबर गेलो असल्याचा दावा मी केला नाही असं म्हणत भुजबळ यांनी सगळे दावे खोटे असल्याचं म्हंटलं आहे.

'२०२४ द एलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया' या राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्पोटाने राजकीय वर्तुळात गदारोळ माजलेला असतानाच आता छगन भुजबळ यांनी मात्र हे सगळे दावे फेटाळले आहे. मी अशी कोणतीच मुलाखत दिली नाही, असंही भुजबळ यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे या पुस्तकातील सर्व दावे खोटे असल्याचं त्यांचं म्हणण आहे.

विधानसभेच्या अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी '२०२४ द एलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया' हे पुस्तक सध्या प्रकाशित केलं आहे. या पुस्तकातील काही मोठ्या खुलाशांनी राजकीय वर्तुळात गदारोळ सुरू झाला आहे. पुस्तकातील एका प्रकरणात छगन भुजबळ यांनी ईडीच्या कारवाई बद्दल धक्कादायक दावे केले आहेत. 'मी ओबीसी असल्याने माझ्यावर कारवाई झाली, मात्र मी भाजपबरोबर गेल्याने मला ईडीपासून सुटका मिळाली. माझ्यासाठी ईडीपासून मुक्ती म्हणजे पुनर्जन्म आहे.' असं भुजबळ यांनी या पुस्तकात म्हंटलं आहे. मात्र आता हे सगळे दावे खोटे असल्याचं भुजबळ यांनी म्हंटलं आहे. मी अशी कुठलीच मुलाखत दिलेली नाही, असं म्हणत भुजबळ यांनी हे दावे फेटाळले आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com