Palghar News : विधानसभा निवडणुकीत पैशांचा पाऊस, पालघरमध्ये ४ कोटींची रोकड जप्त, VIDEO

Maharashtra Election news : मुंबई, पुणे, सोलापूर असो अथवा मराठवाडा, प्रत्येक ठिकाणी कोट्यवधीचं घबाड जप्त केलेय.
Election Commission seized Crores cash
Election Commission seized Crores cashElection Commission seized Crores cash
Published On

रूपेश पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

Election Commission seized Crores of cash : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लुरु आहे. आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं धडक कारवाई करत आतापर्यंत कोट्यवधींचं घबाड जप्त केलंय. मुंबई, पुणे, सोलापूर असो अथवा मराठवाडा, प्रत्येक ठिकाणी कोट्यवधीचं घबाड जप्त केलेय. काल मुंबई आणि पालघरमध्ये मोठी रक्कम जप्त करण्यात आली होती. आजही पालघरमधून तब्बल चार कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

पालघरच्या वाडा येथे तीन कोटी सत्तर लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. वाडा येथून विक्रमगडकडे जाणारे संशयित वाहन ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. त्या वाहनात करोडोची रोकड असल्याचं उघड झालं. नवी मुंबईतील ऐरोली येथून रोकड घेऊन जाणारं वाहन वाडा , जव्हार, मोखाडा येथे जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Election Commission seized Crores cash
Khopoli Accident : भल्या पहाटे पुणे-मुंबई महामार्गावर अपघात, खासगी बस ट्रकला धडकली, ८ जणांची प्रकृती चिंताजनक

नाकाबंदीमध्ये पोलिसांची मोठी कारवाई -

राज्यात विधानसभा निवडणूक होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. पालघरच्या वाडा येथील वाडा पाली मार्गावर विक्रमगडच्या दिशेने जात असलेली एक संशयीत व्हॅन नाकाबंदी आणि तपासणी करत असलेल्या वाडा पोलिसांना दिसून आली. त्याची पूर्ण तपासणी आणि चौकशी करत असताना व्हॅनमध्ये तीन कोटी सत्तर लाख रुपये रक्कम असल्याचे वाडा पोलिसांना आढळून आले. ही व्हॅन नवी मुंबई येथून रोकड घेऊन वाडा जवळ मोखाडा येथे जात असल्याची पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. वाहानतील रक्कम कोणाची आणि कुठे जात होती? याचा तपास सध्या वाडा पोलीस करत आहेत.

Election Commission seized Crores cash
Maharashtra Election : निवडणुकीत पैशांचा महापूर, भुलेश्वरमधून २.३ कोटी तर शिवडीत १.१० कोटी जप्त

निवडणुकीत पैशांचा पाऊस -

पालघर जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस पडत असल्याचं दिसून येत असून या अगोदरही महाराष्ट्र गुजरात सीमेवर तलासरी पोलिसांकडून चार कोटी 25 लाखाची रक्कम जप्त करण्यात आली होती. तर विरार आणि नालासोपाऱ्यांमध्येही नाकाबंदी आणि तपासणी करत असताना सहा कोटी रक्कम जप्त करण्यात आली.

Election Commission seized Crores cash
Maharashtra Election : विरारमध्ये पैशांचा पाऊस; काल ७ कोटी आज २ कोटी जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com