Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅगांची झडती घेतानाचा VIDEO, शिंदे-फडणवीसांच्या बॅगा तपासल्या का? निवडणूक अधिकाऱ्यांवर संतापले

Uddhav Thackeray : प्रचारावेळी उद्धव ठाकरेंच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्या. त्यावरुन महाराष्ट्राचे राजकारण तापलेय.
uddhav thackeray
uddhav thackerayuddhav thackeray
Published On

Uddhav Thackeray and Election Commission officer News : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. यवतमाळ येथील वणी येथे उद्धव ठाकरे आज सभेसाठी गेले होते. त्यावेळी हेलिपॅडवर ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. ठाकरेंच्या बॅगा तपासल्यानंतर मविआच्या नेत्यांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. ठाकरेंच्या बॅगा तपासतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. बॅगा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांवर ठाकरेंनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्या अधिकाऱ्यांचं नाव-गावही विचारले. त्याशिवाय नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगांची तपासणी केली का? असा सवाल यावेळी ठाकरेंनी अधिकाऱ्यांना विचारला.

ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांची शाळा घेतलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये ठाकरेंकडून प्रश्नांची सरबत्ती केलेली दिसत आहे. ठाकरेंच्या प्रश्नाला निवडणूक अधिकाऱ्यांकडे कोणतेही उत्तर नसल्याचे व्हिडीओतून दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे दिसत नाहीत, पण त्यांचा आवाज ठळकपणे ऐकू येतोय.

ठाकरे अधिकाऱ्यांना काय म्हणाले?

तुम्ही आत्तापर्यंत कधी शिंदेंची बॅग तपासली का? देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचं सामान तपासलं का? मीच पहिला आहे का? मोदी - शहा आले तर त्यांच्या बॅग तपासण्याचा व्हिडिओ मला बनवून पाठवा. मला तुमची नावं सांगा, माझं नाव उद्धव ठाकरे आहे, तुमची नावसुद्धा सांगा. महाराष्ट्रातल्या तपासण्या करायला सुद्धा आता बाहेरच्या राज्याची माणसं आणली जातात, असं म्हणत उपहासात्मक टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com