Kolhapur News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News: हृदयद्रावक! दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू, कोल्हापुरमधील घटना

Kolhpaur Latest News: कोल्हापुरमध्ये दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झालाय. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रणजित मांजगावकर, साम टीव्ही

Sisters Death After Falling Into Well

मृत्यू कधी कुणाला कवटाळेल हे सांगता येत नाही. हसतं खेळतं कुटुंबही क्षणार्धात उद्धस्त होवू शकतं. अशीच एक घटना कोल्हापुरमध्ये घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) पिराचीवाडी इथं एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतात गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू (Death) झाला आहे. (Latest News)

कोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी इथं भोसले याचं हसतं खेळतं कुटुंब होतं. पण, त्याला काळाची नजर लागली. त्यांच्या दोन चिमुकल्यांचा (2 sisters) विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आराध्या सुरेश भोसले आणि आरोही सुरेश भोसले अशी या दोन सख्ख्या बहिणींची नावं आहेत. या दोघी बहिणी काल आपले वडील सुरेश भोसले यांच्यासोबत शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. तिथेच त्यांच्यावर काळाने घाला (Sisters Death) घातला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उसाला पाणी देण्यासाठी शेतात गेल्या होत्या

या दोघींना शेतात गेल्यानंतर काही वेळाने सुरेश भोसले यांनी घरी जाण्यास सांगितले. त्यांनंतर सुरेश यांना वाटले की मुली घरी गेल्या आहेत. त्यामुळे ते निवांतपणे आपल्या पत्नीसह उसाला पाणी देत होते. काही वेळाने उसाला पाणी पाजून झाल्यानंतर आई अश्विनी या घरी गेल्या. मात्र, तेव्हा त्यांना आपल्या दोन्ही मुली घरी नसल्याचं समजलं. मग त्या घाबरून गेल्या. एकच धावपळ सुरू झाली. मुलींचा शोध सुरू झाला.

विहीरीत सापडले मुलींचे मृतदेह

घर आणि शेताच्या परिसरात सगळीकडे त्यांना शोधून झालं. पण, बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर मुली सापडल्या नाहीत. दरम्यान विहिरीवर दोन्ही मुलींच्या चपला दिसल्या. त्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीत उतरून शोध घेतला असता दोन्ही मुलीचे मृतदेह सापडले. या मुलींच्या पालकांनी एकच हंबरडा (Kolhapur News) फोडला. या घटनेमुळं भोसले कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे. या मुलींच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

परभणीतही अशीच घटना

परभणीतून ९ जानेवारी रोजी अशीच एक दुर्देवी घटना समोर आली होती. परभणीच्या जिंतूर शहरातील जमजम कॉलनी परिसरातील ६५ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पाय पसरून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. रामराव विठ्ठलराव रोकडे असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव (marathi news) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT