MP Crime News: धक्कादायक! भोपाळमधील 'बेकायदेशीर' बालिकागृहातून २६ मुली बेपत्ता

Girls Missing From Shelter Home: भोपाळमध्ये परवानगीशिवाय सुरू असलेल्या बालिकागृहातून २६ मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवली आहे.
MP Crime
MP CrimeSaam Tv
Published On

Bhopal Crime News

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये परवानगीशिवाय बालिकागृह चालवले जात असल्याचं समोर येतंय. त्यात एका बालिकागृहातून २६ मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तातडीनं कारवाई करण्याचं आवाहन केलंय. (latest crime news)

बालिकागृहात ६८ मुलींचा प्रवेश होता. त्यापैकी ४१ मुली घटनास्थळी हजर होत्या. या बालिकागृहात गुजरात, झारखंड, राजस्थान व्यतिरिक्त मध्य प्रदेशातील सीहोर, रायसेन, छिंदवाडा, बालाघाट येथील मुली देखील होत्या होती. भोपाळच्या परवालिया पोलीस स्टेशन परिसरात हे बालिकागृह चालवलं जात (Madhya Pradesh) होतं.

बालिकागृह बेकायदेशीर

पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवली आहे. राष्ट्रीय बाल आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनीही मध्य प्रदेशच्या मुख्य सचिव वीरा राणा यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून भोपाळमधील आंचल बालिकागृहाची पाहणी केल्याचं सांगितलंय. यावेळी त्यांनी बालिकागृहातील अधिकारी व उपस्थित मुलींशी संवाद (Bhopal) साधला.

बालिकागृहाची कायदेशीर नोंदणी किंवा मान्यताही नसल्याचं समोर आलंय. संलग्न यादीमध्ये 68 निवासी मुलींची नोंद करण्यात आली होती. तपासणी दरम्यान केवळ 41 मुली आढळल्या. भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकरणी 'x' या समाज माध्यमांवर पोस्ट शेअर केलीय. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारला तात्काळ कारवाई करण्याची विनंती करतो, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

MP Crime
Latest News Update LIVE : आदित्य ठाकरे उद्या दिघा रेल्वे स्टेशनची पाहणी करणार

प्रियांक कानूनगो यांनी सोशल मिडीयावर याप्रकरणी पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये त्यांनी राज्य बाल आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांसह भोपाळ येथील परवालिया येथे एका संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर बालिकागृहाची संयुक्तपणे पाहणी केल्याचं सांगितलंय. ही स्वयंसेवी संस्था सरकारी संस्थेप्रमाणे चाइल्ड लाइन पार्टनर म्हणून काम करत आहे. त्यांनी सरकारी प्रतिनिधी म्हणून काम केलंय. ते सरकारची परवानगी न घेता हे बालिकागृह चालवत आहेत.

बेपत्ता झालेल्या मुली या ६ ते १८ या वयोगटातील असल्याचं त्यांनी सांगितलंय. याप्रकरणी त्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्य सचिवांना देखील पत्र लिहिलं आहे.

MP Crime
Sharad Mohol latest news : कुख्यात गुंड शरद मोहोळचे मारेकरी कोण? आरोपींची नावं आली समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com