शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे उद्या दिघा स्टेशनची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून हे दिघा स्टेशन तयार असूनही त्याचं उद्घाटन केलं जात नसल्याचा आरोप वारंवार आदित्य ठाकरे करत आहेत. व्हीव्हीआयपीच्या वेळेची वाट पाहत उद्घाटन केलं जात नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यामुळे उद्या स्थानिक खासदार राजन विचारे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी या दिघा स्टेशनची पाहणी करायला जाणार आहेत. उद्या दुपारी साडेचार वाजता ही पाहणी केली जाणार आहे.
राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी मंदिराच्या ट्रस्टने देशातील बहुतांश राजकीय नेत्यांना आमंत्रण पाठवलं आहे. मात्र, मंदिर सोहळ्याला उद्धव ठाकरे जाणार नसल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
'22 जानेवारी रोजी अयोध्येत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. परंतु आम्ही मात्र अयोध्येत न जाता नाशिक येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राम मंदिरासाठी शहीद झालेल्यांना अभिवादन करणार आहोत. तसेच महाराष्ट्रातील झंजावाताला सुरुवात करणार असल्याचे राऊत यांनी धुळ्यात स्पष्ट केले आहे.
Mumbai vehicle Fire:
मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील डहाणूकरवाडी सिग्नलला भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकीला अचानक आग लागली. आज शनिवारी दुपारी 2:30 च्या सुमारास दुचाकीला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच दुचाकी चालक बाजूला झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा 2 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या.
अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझविली. या आगीत दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली आहे. दुचाकीला आग कशामुळे लागली, या संदर्भात अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस तपास करत आहे.
जालन्यात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. मनोज जरांगे म्हणाले, 'मुंबईला जायची आम्हाला हौस नाही. तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण दिलं असतं तर आज हे दिवस आले नसते, असं जरांगे म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती यांचे कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत
2009 ला दिलेली जखम अजून विसरलेलो नाही
कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर किंवा अन्य कुठून निवडणूक लढवणार ते लवकरच सांगणार
मात्र स्वराज्य लोकसभा निवडणुकीसाठी मुख्य प्रवाहात असेल, संभाजीराजेचं सूचक वक्तव्य
धनगर आरक्षणासाठी परभणी तालुक्यात युवकाची आत्महत्या
परभणी तालुक्यातील आर्वीत गावाच्या युवकाने धनगर आरक्षणासाठी संपवलं जीवन
शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावून केली आत्महत्या
शिवाजी दत्तराव कारके असे या मयत युवकाचे नाव
आत्महतेपूर्वी मयत युवकाकडे सुसाईड नोट सापडली
लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली असून ठाकरे गट देखील अॅक्शन मोडवर आला आहे. स्वतः आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून आज दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यासाठी गिरगावमध्ये जाहीर सभा घेत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या या सभेची जोरदार तयारी शिवसैनिकांकडून केली जात आहे.
महिलांच्या मंगळसूत्राचा,कुंकवाचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया मागासवर्ग आयोगाच्या प्रश्नावलीवर मराठा महिलांनी दिल्या आहेत.जालन्यातील एक लहेरा गावातील महिलांनी या प्रश्नावलीवर संताप व्यक्त करत आरक्षण देण्याची मागणी केलीय.
वाशिमच्या रिसोड शहरातील वाशिम - लोणार मार्गावर एका ट्रकने दुचाकी चालकाला चिरडल्याची घटना घडलीय.अपघातात दुचाकी चालक सुनील धुत यांचा जागीच मृत्यू झाला. सुनील धुत हे आपले बँकेचे काम करण्यासाठी जात असताना रिसोड शहरातील डॉ. जितेंद्र गवळी यांच्या हॉस्पिटलजवळ एका पीकअप वाहनामधील व्यक्तीने अचानक त्याचा दरवाजा उघडला आणि त्याचा फटका दुचाकी चालक सुनील धुत यांना बसून ते महामार्गावर खाली पडले. तेवढ्यात सिमेंटचा ट्रक जात असताना त्या ट्रकच्या चाकाखाली येऊन ते चिरडले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कोल्हापूरच्या पावनगड परिसरात संचारबंदी आदेश लागू
पन्हाळगडा शेजारी असणाऱ्या पावन गडावरील बेकायदेशीर मदरसा हटवण्याची प्रक्रिया सुरू
पावनगडावरील मदरसा पाडकामाच्या पार्श्वभूमीवर लागू केली संचारबंदी
आज रात्री बारा वाजेपर्यंत राहणार संचारबंदी आदेश लागू
पाडकामापर्यंत जायला माध्यमांना देखील मज्जाव
पन्हाळगडा शेजारी असणाऱ्या पावन गडावरील बेकायदेशीर मदरसा हटवण्याची प्रक्रिया सुरू
राजकारणामध्ये काही धाडसी प्रयोग केले जातात. दिग्दर्शक जब्बार पटेल करतात तसे आम्ही पण एक धाडसी प्रयोग दीड वर्षांपूर्वी केला आहे. त्याची नोंद इतिहास नक्की घेईल. जब्बार पटेल यांना चित्रपटासाठी एक विषय नक्कीच होईल. नाट्यसंमोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य.
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात उमेदवार ठरविण्याचा सर्वाधिकार हा वरिष्ठाकडे असेल.
भाजप आणि शिंदे यांची शिवसेना हे एकत्रच निवडणूक लढवणार आहेत.
या निवडणुकीसाठी प्रमोद जठार व किरण सामंत इच्छुक आहेत.
ज्यांना कोणाला उमेदवारी मिळेल त्याचा दोन्ही पक्ष एकत्रितपणे प्रचार करतील आणि विजय मिळवतील, असं निलेश राणे यांनी म्हटलंय.
मल्लिकार्जुन खरगे
आम्ही INDIA आघाडीच्या नेते, मित्रपक्ष, सामान्य लोकांना सहभागी होण्यासाठी निमंत्रित केलं आहे
सगळ्यांनी यात सहभागी व्हावं यासाठी आताही निमंत्रण देतो
भाजप खुलेआम ED, CBI, IT कडून विरोधी पक्षातील नेते आणि त्यांच्या नातेवाईकांवर टार्गेट करत आहेत
घाबरवण्यासाठी या गोष्टी भाजप करत आहेत
कुठल्यातरी केस वर त्यांना आत घेतात आणि जर त्यांनी तुमच्यासोबत आले तर त्यांना क्लिनचीट देता
क्लिनचीटची ड्राय फॅक्टरी शाह यांच्याकडे आहे
आमच्याकडे असेल तर कलंकित आणि तुमच्याकडे आले की क्लिनचीट अशी यांची सध्या पद्धत आहे
अजित पवार नाट्य संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमाला अनुपस्थित
अजित पवार यांच्यासाठी स्टेजवर खूर्चीही राखीव नाही
त्यामुळे परत एकदा शरद पवार यांच्यासोबत स्टेजवर येणं टाळलं
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विदर्भातील 10 पैकी 3 जागेवर दावा केलाय. विशेष म्हणजे गोंदिया भंडारा असो गडचिरोली असो वर्धा जिल्हा असो या तिन्ही जागेवर भाजपचे खासदार आहेत.
यात भाजपचे विद्यामान खासदार असलेल्या अशोक नेते यांच्या जागेवर अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी स्वतः इच्छुक असल्याचं सांगितलं आहे.
भंडारा गोंदिया या ठिकाणी भाजपचे सुनील मेंढे विद्यमान खासदार आहे, पण याठिकाणी सुद्धा दावा करण्यात आला असून प्रफुल पटेल यांच्यासाठी जागा मागण्याची तयारी आहे.
वर्ध्यात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस असताना या ठिकाणी अजित पवार गटाकडून मागणी केली जात आहे. त्याठिकाणी माजी केंद्रीय मंत्री राहिलेले सुबोध मोहिते हे स्वत: तयारी करत असून वर्धा लोकसभा मतदारसंघातील अनेक लोकांच्या ते संपर्कात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आता एप्रिल किंवा मे मध्ये येणार
ब्रिटन सरकारकडून प्रक्रिया सुरू असल्याने वाघनख आता एप्रिल किंवा मे महिन्यात राज्यात येतील
याआधी जानेवारी आणण्याची तयारी करण्यात आली होती
मात्र ब्रिटन सरकारची प्रक्रिया सुरू असल्याने वाघनखे एप्रिल किंवा मे महिन्यात राज्यात येतील
नाशिकमध्ये डेंग्यूचा डंख कायम, जानेवारीच्या पाच दिवसातच डेंग्यूचे ११ रुग्ण आढळले
सहसा पावसाळ्यात होणारा डेंग्यूचा उद्रेक यंदा पावसाळा संपल्यानंतरही कायम
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच डेंग्यूचा प्रादुर्भाव आरोग्य यंत्रणांसाठी चिंतेचा विषय
मागील वर्षभरात नाशिकमध्ये आढळले होते डेंग्यूचे तब्बल ११९१ रुग्ण
नोव्हेंबरमध्ये २७५ तर डिसेंबरमध्ये २०५ जणांना झाली होती डेंग्यूची लागण
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच डेंग्यूचे रुग्ण वाढू लागल्याने डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी
महाबळेश्वर,पाचगणी आणि भिलार या परिसरामध्ये असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर आज पहाटेपासूनच प्रशासनाने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. खिंगर, भोसे, भीलार या परिसरातील बांधकामांवर एकाच वेळी पहाटेपासून पोकलेन, जेसीबीच्या सहायने पडण्यास सुरवात झाली आहे.
अजित पवार आणि शरद पवार नाट्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात एकत्र दिसणार आहेत. शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा उद्घाटन समारंभ आज पिंपरी चिंचवड येथे होत आहे. या कार्यक्रमाला अजित पवार आणि शरद पवार दोघेही उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नाट्यसंमेलनाचा उद्घाटन समारंभात उपस्थित असणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री, अजित पवार आणि शरद पवार आज एकाच मंचावर असतील
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.