भरधाव कारने तरुणीला फुटपाथवर चिरडले, २०० मीटर फरफटत नेलं; बाईक, रिक्षा अन् कारला धडक; थरार सीसीटीव्हीत कैद

Belapur road accident news : नवी मुंबईतील बेलापूरमध्ये भरधाव स्कॉर्पिओने फुटपाथवरील तरुणीला जोरदार धडक देत २०० मीटर फरपटत नेले. बाईक, रिक्षा आणि कारलाही धडक दिल्याची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Navi Mumbai CCTV accident video
Navi Mumbai CCTV accident video
Published On

Navi Mumbai CCTV accident video : नवी मुंबईतील बेलापूरमध्ये अतिशय भीषण आणि थरकाप उडवणारा अपघात झाल्याचे समोर आले आहे. एका भरधाव वेगात आलेल्या स्कॉर्पिओ कारने फूटपाथवरून चालणाऱ्या एका तरुणीला मागून जोरदार धडक देत चिरडले. कार इतक्यावरच थांबली नाही तर २०० मीटरपर्यंत तरूणाली फरपटत नेलं.. कारने यादरम्यान दुचाकी, रिक्षा आणि दुसऱ्या कारलाही उडवले. या भीषण अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. या अपघातात दुचाकी, कार आणि रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरूणीवर जवळच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर सेक्टर ८ मधील 'अरेंजर कॉर्नर' परिसरात अपघात झाला. १९ वर्षीय तरुण स्कॉर्पिओ कार चालवत होता. कारचा वेग अति प्रमाणात होता. १९ वर्षाच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार थेट फुटपाथवर चढली. यावेळी तिथून चालत जाणाऱ्या एका तरुणीला कारने मागून जोरात धडक दिली आणि तिला गाडीखाली २०० मीटरपर्यंत चिरडले.

ही कार एवढ्यावरच थांबली नाही. कारने पुढे उभ्या असलेल्या एका रिक्षेला, एका दुचाकीला आणि पार्किंगमध्ये असलेल्या २-३ कारना जोरदार धडक दिली. या धडकेत सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातानंतर पोलिसांनी कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. अपघातावेळी १९ वर्षाच्या मुलाने दारू प्यायली होती का? कारचे ब्रेक फेल झालेले होते का? अपघात नेमका झाला कसा? याचा तपास करण्यात येत आहे.

Navi Mumbai CCTV accident video
घरगुती गॅसचा साठा, व्यावसायिकांवर छापा; सामच्या ऑपरेशन सिलेंडरनंतर प्रशासनाला जाग

या अपघातामध्ये तरूणी गंभीर जखमी झाली आहे. तरुणीला तातडीने बेलापूर येथील एमजीएम (MGM) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच बेलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत स्कॉर्पिओ कारचालक आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. कार चालवणारा तरुण अवघ्या १९ वर्षांचा असून त्याच्या बेदरकारपणामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे बेलापूर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Navi Mumbai CCTV accident video
Education Scam : शिक्षण विभागातील सर्वात मोठा घोटाळा, सरकारलाच १५० कोटींचा गंडा, अशी झाली पोलखोल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com