ED Arrest Suraj Chavan: मोठी बातमी! आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक

ED Arrest Suraj Chavan: आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि BMC त कोविडकाळात झालेल्या खिचडी घोटाळा प्रकरणात आरोप असलेले सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
ED Arrest Suraj Chavan
ED Arrest Suraj ChavanSaam Digital
Published On

ED Arrest Suraj Chavan

मुंबई महानगरपालिकेत कोविडकाळात १३२ कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. त्यात सूरज चव्हाण यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. दरम्यान आज सूरज चव्हाण यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. सूरज चव्हाण आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. खिचडी घोटाळाच्या आरोपांनंतर काही महिन्यांपूर्वी ईडीने मुंबईत सात ठिकाणी छापेमारी केली होती. यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह सूरज चव्हाण यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता.

शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. कोविड काळात स्थलांतरीत मजुरांना खिडची वाटपाचा निर्णय हा तत्कालिन ठाकरे सरकारने घेतला होता. यासाठी विविध कंपन्यांना कंत्राटं देण्यात आली होती. यातील एका कंपनीत सूरज चव्हाण यांच सहभाग होता. आज सकाळी चव्हाण यांना चौकशीसाठी बोलावलं होतं, चौकशीत सहभाग निश्चित झाल्यानंतर चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.

कोण आहेत सूरज चव्हाण?

युवा सेनेचा साधारण कार्यकर्ता शिवसेनेचा शाखाप्रमुख ते आदित्य ठाकरेंचा विश्वासू ते थेट ठाकरे गटाचे सचिव, असा राजकीय प्रवास सूरज चव्हाण यांचा आहे. सर्वप्रथम त्यांनी वरळीतील शिवसेनेच्या शाखेपासून कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर शिवसेना भवन व मातोश्री असा त्यांचा प्रवास आहे. आदित्य ठाकरेंनी युवा सेनेची स्थापन केल्यानंतर त्यांनी स्वतःला युवा सेनेच्या कामात झोकून दिलं. त्यामुळे लवकरच आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तींमध्ये सूरज चव्हाण यांनी स्थान मिळवलं.आदित्य ठाकरे मातोश्रीबाहेर पडले की, सूरज चव्हाण त्यांच्यासोबत कायम असायचे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचं शेड्यूलही सूरज चव्हाणच बनवत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ED Arrest Suraj Chavan
Badgujar : सुधाकर बडगुजरांच्या अडचणीत वाढ; Bail की jail २० तारखेला कळेल

मुंबई विद्यापाठीच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेने दहाच्या दहा जागा जिंकल्या होत्या. यामागे सूरज चव्हाण यांचीच रणनिती होती. शिवसेना भवन येथे तिसऱ्या मजल्यावर सूरज चव्हाण युवासेनेच काम पाहत होते. अनेकवेळा पडदयामागची भूमिका सूरज तेच पार पाडत. चौकशी यंत्रणांकडून चौकशी सुरू झाल्यानंतर सूरज चव्हाण यांना आदित्य ठाकरे यांनी बाजूला केल्याची देखील चर्चा दबाक्या आवाजात सुरू होती. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या आसपास देखील कमी पाहायला मिळत होते. यावेळी रविराज कुलकर्णी हे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचं शेड्युल बनवत होते. माजी नगरसेवक अमेय घोले यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश करताना सूरज चव्हाण यांच्यावर उघडपने आरोप केले होते.

ED Arrest Suraj Chavan
Badgujar : सुधाकर बडगुजरांच्या अडचणीत वाढ; Bail की jail २० तारखेला कळेल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com