Cheese Tandoor Vadapav: स्ट्रीट फूडप्रेमींनी एकादा तरी नक्की बनवा क्रंची चीज तंदूर वडापाव, वाचा खास रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, लसूण, आलं, हळद, मोहरी, कढीपत्ता, मीठ, बेसन, तंदूरी मसाला, ब्रेडक्रम्ब्स, चीज स्लाइस, पाव आणि चटण्या तयार ठेवा.

Crunchy Cheese Tandoor Vadapav Recipe | Saam Tv

बटाट्याचा मसाला बनवा

कढईत तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण आणि आलं परता. त्यात उकडलेले बटाटे, हळद आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.

Crunchy Cheese Tandoor Vadapav Recipe | Saam tv

वड्याचे गोळे तयार करा

तयार बटाट्याच्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवा आणि प्रत्येक गोळ्याच्या मध्ये चीजचा तुकडा ठेवा.

Crunchy Cheese Tandoor Vadapav Recipe,

बेसनचं पीठ तयार करा

बेसनमध्ये मीठ, लाल तिखट आणि थोडा तंदूरी मसाला घालून पाणी टाकून घट्ट पीठ तयार करा.

Crunchy Cheese Tandoor Vadapav Recipe,

क्रंची कोटिंग करा

बटाट्याचे गोळे आधी बेसनाच्या पिठात बुडवा आणि नंतर ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा, त्यामुळे वडे अधिक कुरकुरीत होतात.

Crunchy Cheese Tandoor Vadapav Recipe

वडे तळून घ्या

कढईत तेल गरम करून तयार वडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत डीप फ्राय करा.

Crunchy Cheese Tandoor Vadapav Recipe | Saam Tv

वडापाव तयार करा

पावावर लसूण चटणी, हिरवी चटणी लावा, त्यात तयार वडा ठेवा आणि वरून तंदूरी सॉस किंवा मेयो घालून गरमागरम सर्व्ह करा.

Crunchy Cheese Tandoor Vadapav Recipe | Saam tv

Eye Care: चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे? मग डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' ७ फळ ठरतील वरदान

Eye Care | Saam Tv
येथे क्लिक करा