मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
अलिकडेच ऐश्वर्या नारकर यांनी योगा करतानाचा व्हिडीओ शेअर केला.
कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांची अभिनेत्रीने चांगली शाळा घेतली.
मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्रीसोबत ऐश्वर्या नारकर या एक बिजनेसवुमन देखील आहे. त्यांचा साडीचा ब्रँड आहे. त्या आपल्या कामाविषयी, डान्स रील्स, वैयक्तिक आयुष्य, फिटनेस , फॅशन, व्यवसाय यांसंबिधित माहिती सोशल मीडियावर शेअर करतात. त्या आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देतात. अलिकडेच त्यांनी एक योगा करताना व्हिडीओ शेअर केला. ज्यामुळे त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.
ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या योगा व्हिडीओवर खूप निगेटिव्ह कमेंट्स आल्या. ज्यांना अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच त्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री शॉर्ट आउटफिट घालून योगा करताना दिसत आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. त्यांच्या छोट्या कपड्यांवर कमेंट्स केल्या आहेत. ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता, एका युजरने लिहिलं की, "निदान कॅमेऱ्यासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम, व्हिडीओला व्ह्यूज वाढवण्यासाठी असे कपडे घालून व्हिडीओ बनवता..."
युजरला उत्तर देत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, "बुरसटलेले विचार सोडा, तुमचा फोकस का हलतोय? मुद्दा व्यायामाचा आहे. कोणी काय कपडे घालावे हा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्या कमेंटवरून तुमची अक्कल कळतेच. यापेक्षा व्यायाम करा उपयोगी पडेल..." त्यावर तो यूजर शांत बसला नाही, तो पुढे म्हणाला की, "तुमच्या अशा कपड्यांमुळे लहान मुलं बिघडतात त्याचं काय?" त्यावर अभिनेत्रीने उत्तर दिले की, "लहान मुलांना व्यायाम करायला शिकवा, म्हणजे विचारांचा समतोल राहील. डोकं शाबूत राहील. नाहीतर मोठी होऊन ती तुमच्यासारखी होतील."
ऐश्वर्या नारकर यांना यापूर्वी देखील अनेक वेळा ट्रोल केले गेले आहे. मात्र कायम त्या आपली बाजू ठामपणे मांडताना दिसल्या आहेत. त्यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. सध्या त्या त्यांच्या व्यवसायात व्यस्त असलेल्या पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.