'धुरंधर' फेम अभिनेता संजय दत्तवर चाहत्याने प्रेमाचा वर्षाव केला आहे.
पाकिस्तानी चाहत्याने संजय दत्तला कोट्यावधींचे गिफ्ट्स दिले आहेत.
संजय दत्तला चाहत्याकडून Gold Plated आयफोन आणि घड्याळ भेटवस्तू म्हणून मिळाले.
'धुरंधर' स्टार बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt ) सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. चाहते कायमच स्टार्सना भेटायला उत्सुक असतात. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. असाच एक प्रकार आता संजय दत्तसोबत घडला आहे. संजय दत्तला त्याचा जबरा फॅन भेटला आहे. संजय दत्तच्या पाकिस्तानी चाहत्याने अभिनेत्याला महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.
प्रसिद्ध पाकिस्तानी टिकटॉकर काशिफ जमीरने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला कोटी रुपयांच्या भेटवस्तू भेट दिल्या आहेत. संजय दत्त अनेकदा दुबईमध्ये दिसतो. जिथे त्याचे संपूर्ण कुटुंब राहते. तो तिथे आपल्या चाहत्यांना भेटतो. अशात नुकताच संजय दत्त त्याचा पाकिस्तानी चाहता काशिफ जमीरला भेटला. काशिफ जमीर टिकटॉक व्हिडिओसाठी प्रसिद्ध आहे. भेटीदरम्यान, काशिफने संजय दत्तचे भरभरून कौतुक केले.
काशिफ जमीरने संजय दत्तला सोन्याचा प्लेटेड आयफोन 17 आणि एक अमूल्य घड्याळ भेट दिले. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काशिफ संजय दत्तला 21 कॅरेट सोन्याचे स्पॅनिश वुल्फ लेदर घड्याळ भेट देतो. मीडिया रिपोर्टनुसार, त्याची किंमत १३ किंवा १२ लाख रुपये आहे. याशिवाय, चाहत्याने सोन्याचा प्लेटेड आयफोन 17 आहे, जे खास अभिनेत्यासाठी कस्टमाइझ केले आहे. काशिफने फोनच्या मागे संजय दत्तचा पालकांसोबतचा फोटो छापला आहे.
काशिफने संजय दत्तच्या बायकोला मान्यताला एक खास दागिन्यांचा सेट देखील भेट दिला. हे सर्व गिफ्ट्स पाहून संजय दत्त भारावून गेला. त्याने आनंदाने भेट स्वीकारली. संजय दत्तचे चाहते जगभरात पाहायला मिळतात. 'धुरंधर 2' चित्रपट 19 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.