Shruti Vilas Kadam
झुंबा हा एक एनर्जेटिक डान्स वर्कआउट आहे. झुंबा करताना शरीरातील मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
झुंबामध्ये हात, पाय, कंबर आणि पोट अशा शरीराच्या अनेक भागांचा एकाच वेळी व्यायाम होतो. त्यामुळे बॉडी टोनिंगसाठीही झुंबा फायदेशीर ठरतो.
नियमित झुंबा केल्याने शरीराचा मेटाबॉलिझम सुधारतो. मेटाबॉलिझम वाढल्यामुळे शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते.
झुंबा करताना वेगवेगळ्या डान्स स्टेप्समुळे पोट आणि कंबरेवर चांगला परिणाम होतो. त्यामुळे बेली फॅट कमी करण्यासाठी झुंबा उपयुक्त ठरतो.
म्युझिकसोबत डान्स केल्यामुळे मन आनंदी राहते. झुंबामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्यही सुधारते.
झुंबा करताना शरीर सतत हलत असल्यामुळे स्नायू अधिक लवचिक होतात. त्यामुळे शरीराची हालचाल आणि फिटनेस सुधारतो.
जिमच्या तुलनेत झुंबा हा मजेशीर आणि एनर्जेटिक व्यायाम आहे. त्यामुळे कंटाळा न येता नियमित व्यायाम करण्याची सवय लागते.