Locals gather near the site as rescue teams recover bodies after tragic drowning incidents in Yavatmal and Wardha districts. saam tv
महाराष्ट्र

दारुच्या नशेत मुलासह पाण्यात उतरले, पण तिथेच काळाने गाठले, बापासह निष्पाप चिमुकल्याचाही गेला जीव

Father And Son Drowned In Well In Yavatmal Ghatanji: यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. घाटंजीत बाप-लेक तर शेडगाव येथे वडील, मुलगी आणि तिच्या मैत्रिणीचा नदीत बुडून दुर्दैवी अंत झाला.

Omkar Sonawane

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात एक अतिशय ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. घोटी येथे बाप-लेकाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जाधव (वय 40) आणि त्यांचा 9 वर्षीय मुलगा विहान जाधव हे दोघे विहिरीत बुडाल्याने मृत्यूमुखी पडले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या महितीनुसार, सचिन जाधव यांना दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत त्यांनी आपल्या मुलासोबत विहिरीत पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच सचिन जाधव यांना पोहता येत नसल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पारवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

तर वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव शिवारात ही घटना घडली. अधिकमासानिमित्त आंघोळीसाठी गेलेल्या वडील, मुलगी आणि तिच्या मैत्रिणीचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. अतुल किनकर (वय 45), त्यांची मुलगी रिधीमा किनकर (वय 15) आणि तिची मैत्रीण गुंजन मसराम (वय 15) अशी मृतांची नावे आहेत. तिन्ही जण शेडगाव येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिन्ही मृतदेह नदीतून बाहेर काढले. या दुर्दैवी घटनेमुळे शेडगाव गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तीन जणांच्या अकाली मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; आता व्हीआयपी दर्शन बंद, काय आहे नेमका नियम?

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT