3 People Died In Chhatrapati Sambhajinagar  Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajinagar: विहिरीच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून वडील अन् २ मुलांचा मृत्यू; संपूर्ण गावावर शोककळा

3 People Died In Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये वडील आणि २ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विहिरीच्या कामादरम्यान मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली.

Priya More

Summary -

  • संभाजीनगरमध्ये विहिरीच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना

  • मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तिघांचा मृत्यू

  • वडील आणि दोन मुलांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा

  • सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावातील घटना

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली. विहिरीच्या कामादरम्यान ढिगाऱ्याखाली दबून वडील आणि दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावात ही घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा शिवारात विहिरीचे काम सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वडील आणि दोन तरुण मुलांचा समावेश आहे. बाजीराव सर्जेराव काकडे (५५ वर्षे), आजिनाथ बाजीराव काकडे (२५ वर्षे) आणि शाम बाजीराव काकडे (२२ वर्षे) अशी तिन्ही मृतांची नावं आहेत. ही घटना ९ मे रोजी रात्री रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. नवरा आणि दोन मुलांच्या मृत्यूमुळे बाजीराव काकडे यांच्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली.

विहिरीचे काम सुरू असताना रात्री विहिरीत पाणी साचले. हे पाणी काढण्यासाठी तिघेही बापलेक विहिरीच्या काठावर उभे होते. मात्र माती असल्याने विहीर ढासळली त्यामुळे तिघेही विहिरीत कोसळले. त्यांच्या अंगावर मातीचा ढिगार पडल्यामुळे तिघेही ढिगाऱ्याखाली दबले त्यांना स्वत:चा जीव वाचवण्याची संधी देखील मिळाली नाही. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मातीचा ढिगारा हटवून त्यांनी तिघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण पाणी आणि चिखल यामुळे तिघांचाही श्वास गुदमरून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण धानोरा गावावर शोककळा पसरली. मेहनती आणि मनमिळावू स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या तिघांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT