Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू

Two Youths Die of Electric Shock: नांदेडमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. पोहण्यासाठी त्यांनी विहिरीत उडी मारल्यानंतर विजेचा धक्का लागून त्यांचा जीव गेला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू
Two Youths Die of Electric Shock Saam Tv
Published On

Summary -

  • नांदेडच्या धर्माबादमध्ये दुर्दैवी घटना

  • विहिरीत पोहताना विजेचा धक्का लागून मृत्यू

  • दोन्ही तरुण मित्र होते

  • नांदेड पोलिसांकडून तपास सुरू

संजय सूर्यवंशी, नांदेड

नांदेडमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोहण्यासाठी या तरुणांनी विहिरीत उडी मारली पण यावेळी भयंकर घटना घडली. विजेचा धक्का लागून या दोघांचाही मृत्यू झाला. नांदेडच्या धर्माबाद येथे ही घटना घडली. हे दोन्ही तरुण मित्र होते. त्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दोघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या धर्माबादमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. अविनाश तोंडाकूरवार आणि कृष्णा मार्गींनवार असं मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहेत. उन्हाळा असल्याने दुपारच्या सुमारास दोन्ही तरुण धर्माबादच्या एका विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. पोहण्यासाठी दोघांनी विहिरीत उडी मारली पण ते परत बाहेर आलेच नाहीत. विहिरीतील मोटारीचा विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने दोन्ही तरुणांना विजेचा धक्का लागला आणि त्यांचा मृत्यू झाला.

Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू
Nanded : ७ महिन्यांपूर्वी लग्न, २४ वर्षीय भावाचा अपघाती मृत्यू; गरोदर वहिनीशी दीरानं केलं लग्न, गावानं उचलला लग्नखर्च

या घटनेची माहिती मिळतात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी मोटर बंद केली त्यानंतर दोन्ही तरुणांचे मृतदेह शोधून विहिरीतून बाहेर काढले. या दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेचा तपास नांदेड पोलिस करत आहेत. या घटनेमुळे नांदेडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू
Nanded Crime: शिवसेना कार्यकर्ता सोनू कल्याणकरच्या खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रेयसीच्या आईनेच दिली हत्येची सुपारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com