Chandrapur  Saam tv
महाराष्ट्र

Shocking : जंगलात गेल्या, पुन्हा परतल्याच नाही; वाघाच्या हल्ल्यात ३ महिला ठार, चंद्रपुरात खळबळ

Shocking Chandrapur News : चंद्रपूरच्या सिंदेवाहीत वनविभागाच्या क्षेत्रात गेलेल्या तीन महिलांवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात तिन्ही महिलांचा मृत्यू झाला आहे.

संजय तुमराम साम टीव्ही चंद्रपूर

चंद्रपुरात नागरिकांवर वाघाचे जीवघेणे हल्ले सुरु आहेत. गेल्या काही वर्षांपासून जंगलात फिरणारे नागरिक वाघाच्या हल्ल्यात ठार मारले जात आहेत. जंगलात वाघांचे जीवघेणे हल्ले सुरुच असल्याचं पुन्हा एकदा उघडकीस आलं आहे. चंद्रपूरच्या सिंदेवाहीत वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. वनविभागाच्या परिक्षेत्रात ही घटना घडली आहे. तिन्ही महिलांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या वनविभागाच्या परिक्षेत्रात घडली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील सासू, सूनेचा मृत्यू झाला.

मृत महिलांची नावे कांता बुधाजी चौधरी (वय 65), शुभांगी मनोज चौधरी (28), रेखा शालिक शेंडे (50) अशी आहेत. या तिन्ही महिला मेंढा माल गावातील आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभाग अधिकारी आणि पोलिस कर्मचारी दाखल झाले. तिन्ही महिलांच्या मृत्यूने चौधरी आणि शेंडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वैनगंगा नदीत 3 विद्यार्थी बुडाले

चंद्रपूर-गडचिरोली सीमेवरील वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेले गडचिरोलीतील तीन विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली आहे. तिन्ही युवक गडचिरोलीचे रहिवासी आहेत. नागपूर येथे MBBSच्या प्रथम वर्षात शिकत आहेत. या घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलरवार हे चमूसह घटनास्थळी पोहोचलेले आहेत. त्या तीन विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात आहे.

सुट्टी असल्याने आठ मित्र वैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेले. मात्र यातील तीन जण बुडाले, तर पाच जण बाहेर निघण्यात यशस्वी झाले. बुडालेल्या युवकांत गोपाळ गणेश साखरे, पार्थ बाळासाहेब जाधव, स्वप्नील उद्धवसिंग शिरे यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

SCROLL FOR NEXT