Shreya Maskar
मुंबईजवळील ठाणे हे 'सरोवरांचे शहर' म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात वीकेंडला येथे ट्रिप प्लान करा. खूप मजा येईल.
उपवन तलाव हे ठाण्यातील पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. येथे तलावाचा मोकळा परिसरात फिरण्याची मजाच वेगळी आहे. तुम्ही येथे बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
उपवन तलावाला गेल्यावर खाण्यापिण्याचीही उत्तम सोय आहे. पहाटेच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळी मित्र-परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
येऊर हिल्स हे ठाणे शहराच्या अगदी सीमेवर वसलेले आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेले हे एक घनदाट जंगलमय ठिकाण आहे. झाडांची दाट वनराई, हंगामी धबधबे येथे पाहायला मिळतात.
ट्रेकिंग, पक्षीनिरीक्षण आणि फोटोशूटचा आनंद घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील धुक्याने वेढलेल्या हिरव्यागार निसर्गसौंदर्य पाहायला नक्की जा.
घोडबंदर किल्ला हा उल्हास नदीच्या काठावर टेकडीवर वसलेला ऐतिहासिक किल्ला आहे. मूळतः १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि त्याचबरोबर ठाणे खाडी , नदीकाठच्या परिसराची विहंगम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
घोडबंदर किल्ल्यावरून ठाणे शहराचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तसेच येथून सूर्यास्ताची सुंदर दृश्ये दिसतात.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.