Lonavala-Khandala : पावसाळ्यात लोणावळा-खंडाळ्याचं रूपच बदलतं! 'ही' ५ सुंदर ठिकाणे पाहायला विसरू नका

Shreya Maskar

लोणावळा-खंडाळा

लोणावळा आणि खंडाळा हे पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेतील जुळी थंड हवेची ठिकाणे (हिल स्टेशन्स) आहेत. पावसाळ्यात येथे नक्की वीकेंड ट्रिप प्लान करा.

Lonavala-Khandala | google

भुशी धरण

इंद्रायणी नदीवरील दगडी बांधकामाचे भुशी धरण, जिथे पाणी पायऱ्यांवरून ओसंडून वाहते. त्यामुळे पावसाळ्यात हे ठिकाण अत्यंत उत्साही आणि गजबजलेले असते.

Bhushi Dam | google

टायगर पॉइंट

टायगर पॉइंट हे एका उंच कड्यावरील प्रेक्षणीय स्थळ असून ६५० मीटरहून अधिक खोल दरी आणि पश्चिम घाटाचे विहंगम दृश्यासाठी प्रसिद्ध आहे.

Tiger Point | google

कुणे धबधबा

हिरव्यागार जंगलांनी वेढलेला कुणे धबधबा २०० फूट उंचीचा नेत्रदीपक धबधबा आहे. येथे तुम्हाला फोटोशूटचा आनंद घेता येतो. तुम्ही येथे नक्की फेरफटका मारा.

Kune Falls | google

राजमाची किल्ला

लोणावळा आणि खंडाळा यांच्या दरम्यान राजमाची किल्ला वसलेला आहे. हलक्या स्वरूपाची ट्रेकिंग, निसर्गरम्य पठारे आणि डोंगरांच्या विहंगम दृश्यांसाठी हे ठिकाण लोकप्रिय आहे.

Rajmachi Fort | google

पवना तलाव

लोणावळ्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर मावळ तालुक्यात पवना तलाव हा पवना धरणाच्या जलाशयामुळे तयार झालेला एक सुंदर, कृत्रिम तलाव आहे. येथे कॅम्पिंगचा भन्नाट आनंद घेता येतो.

Pawna Lake | google

निसर्ग सौंदर्य

पावसाळ्यात येथे डोंगर माथ्यावर धुक्याची चादर पाहायला मिळते. हिरवीगार दऱ्या, खळखळणारे धबधबे येथे पाहायला मिळतात.

Natural Beauty | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

Pune Waterfall | AI PHOTO
येथे क्लिक करा...