Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

Shreya Maskar

पुणे

बाणेश्वर धबधबा हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात ऐतिहासिक बाणेश्वर मंदिराच्या अगदी मागे वसलेला आहे.

Pune | google

बाणेश्वर धबधबा

बाणेश्वर धबधबा पुणे शहरापासून नैऋत्य दिशेला सुमारे ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर आणि पुणे-सातारा महामार्गापासून साधारण २.५ किलोमीटर अंतरावर आहे.

Baneshwar Waterfall | google

प्राचीन मंदिर

१८ व्या शतकातील भगवान शंकराच्या प्राचीन मंदिराच्या मागे असलेल्या निसर्गरम्य आणि लहान धबधबा म्हणजे बाणेश्वर धबधबा होय.

Ancient Temple | google

हिरवागार निसर्ग

दाट हिरवेगार जंगलातून फिरण्याचा, पक्षीनिरीक्षण करण्याचा, फोटोशूटचा आनंद येथे घेता येतो. तसेच पावसाळ्यातील शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते.

Lush Green Nature | google

पावसाळा

पावसाळ्यात नैसर्गिक खडकांमधून आणि नदीपात्रातून वाहणारा एक सुंदर लहान धबधबा पाहायला नक्की जा.

Monsoon | google

मंदिर कधी बांधले?

पुण्यातील बाणेश्वर मंदिर १७४९ मध्ये पेशवे नानासाहेब यांनी बांधले होते. मंदिराच्या परिसरात तुम्हाला शांत आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळते.

When was the temple built? | google

पुण्यातील पर्यटन स्थळे

शनिवार वाडा, आगाखान पॅलेस, सिंहगड किल्ला, प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, मुळशी धरण, पानशेत धरण, ताम्हिणी घाट, पवना तलाव, लवासा

Tourist Attractions in Pune | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : हिरव्यागार जंगलात लपलेला इतिहासाचा ठेवा; निसर्ग सौंदर्याने सजलंय 'हे' ठिकाण, पावसाळ्यात एकदा नक्की पाहा

Monsoon Destination | AI PHOTO
येथे क्लिक करा...