Shreya Maskar
'बारडा हिल्स' हे भारतातील सर्वात सुंदर पावसाळी पर्यटन स्थळ आहे. बारडा हिल्सला 'बारडा हिल्स वन्यजीव अभयारण्य' असेही म्हणतात.
'बारडा हिल्स' भारताच्या गुजरात राज्यातील सौराष्ट्र भागात, पोरबंदर आणि जामनगर जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. हे क्षेत्र पोरबंदर या किनारी शहरापासून साधारणपणे १५ ते ४९ किलोमीटर अंतरावर आहे.
बारडा हिल्स वन्यजीव अभयारण्य हे समृद्ध जैवविविधतेसाठी, दुर्मिळ औषधी वनस्पतींसाठी, पावसाळ्यातील निसर्गरम्य हिरवळीसाठी आणि किलेश्वर महादेवसारख्या ऐतिहासिक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.
येथे बिबट्या, नीलगाय, लांडगे, कोल्हे, मगरी आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. तसेच सुमारे ६५० विविध प्रकारच्या वनस्पती आणि झाडांच्या प्रजाती आहेत, ज्यात दुर्मिळ औषधी वनस्पतींचे प्रमाण अधिक आहे.
पावसाळा आणि हिवाळ्यात हे ठिकाण दाट हिरवळ आणि धुक्याने वेढलेल्या दरीत रूपांतरित होते. येथे ट्रेकिंग आणि जंगल सफारीचा आनंद घेता येतो.
किलेश्वर महादेव मंदिर हे टेकड्यांच्या मध्यभागी वसलेले ऐतिहासिक मंदिर आहे, जे भाविक आणि निसर्गप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे.
हे ठिकाण पावसाने न्हाऊन निघालेल्या निसर्गरम्य टेकड्यांनी वेढलेले आहे. येथील चढ-उतारांचा भूभाग दाट झाडीने आच्छादला जातो, ज्यामुळे सूर्योदय, सूर्यास्ताचा सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.