Shreya Maskar
केरळमध्ये मुन्नार हे ठिकाण आहे. पावसाळ्यात विस्तीर्ण चहाचे मळे, हिरवेगार झाडी येथे पाहायला मिळते. तसेच येथे सुंदर धबधबेही आहेत.
कर्नाटक येथे कुर्ग हे निसर्गरम्य ठिकाण आहे, जे भारताचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाते. धुक्याने वेढलेले कॉफीचे मळे, खळाळणारे धबधबे, हिरवीगार मसाल्यांची बाग यासाठी प्रसिद्ध आहे.
वायनाड हा केरळमधील एक प्रसिद्ध डोंगरी जिल्हा आहे. त्यात धुके झाकलेले पर्वत, विस्तीर्ण मसाला आणि चहाचे मळे आणि समृद्ध वन्यजीव आहेत.
तामिळनाडू येथे कोडाईकनाल हे ठिकाण आहे. पावसाने भरलेली आकर्षक सरोवरे, दऱ्यांमधील दाट धुके येथे पाहायला मिळतात.
मेघालय येथे चेरापुंजी आहे. पृथ्वीवरील सर्वात जास्त पावसाच्या ठिकाणांपैकी एक हे आहे. जेथे मुसळधार पावसात नोहकलिकाई धबधब्यासारखे खळाळणारे दृश्य पाहायला मिळतात.
मेघालय येथे शिलाँग आहे. कपल्सना हनिमूनसाठी हे बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही येथे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ट्रिप प्लान करा.
सर्वात स्वस्तात मस्त ठिकाण म्हणजे गोवा होय. येथे दूधसागरसारखे खळाळणारे धबधबे आणि हिरवीगार निसर्ग पाहायला मिळतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.