Shreya Maskar
मुंबईत गोराई बीच हा सुंदर समुद्रकिनारा वसलेला आहे. हे ठिकाण बोरीवली पश्चिम भागातील गोराई गावात वसलेले आहे.
तुम्हाला गोराई बीचला जायचे असेल तर बोरीवली स्टेशनला उतरून पुढे गोराई जेटीपर्यंत रिक्षाने प्रवास करा. त्यानंतर बोटीने प्रवास करून तुम्ही गोराई बीचजवळ पोहचला.
गोराई बीच स्वच्छ सोनेरी वाळू, शांत ग्रामीण वातावरण आणि सपाट व घट्ट किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे; येथे भरती-ओहोटीच्या काळात पर्यटक थेट वाळूवर गाड्या किंवा दुचाकी चालवू शकतात.
गोराई बीचजवळ ग्लोबल विपश्यना पॅगोडा हे सुंदर ध्यान केंद्र आहे. येथील परिसरात छोटे गार्डन देखील आहे. लहान मुलांना येथे खूप मजा येईल.
संध्याकाळच्या दरम्यान गोराई बीचवर गेल्यावर सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तसेच तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.
गोराई बीचवर मनसोक्त सी फूडचा आनंद घ्या. तसेच तुम्ही येथे वाळूत क्रिकेट, फुटबॉल आणि इतर अनेक खेळ देखील खेळू शकता.
गोराई बीचजवळ राहण्याची आणि खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. पावसाळ्यात येथील नजारा खुलून येतो. वीकेंडला परदेशी पर्यटकही येथे गर्दी करतात.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.