Shreya Maskar
मढे घाट धबधब्याला 'लक्ष्मी धबधबा' म्हणूनही ओळखले जाते. हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात स्थित आहे. पावसाळ्यात फिरण्यासाठी हे सुंदर ठिकाण आहे.
मढे घाट धबधबा हा एका खोल दरीत कोसळणाऱ्या ८५० मीटर उंचीच्या नेत्रदीपक प्रवाहासाठी, पावसाळ्यातील रोमांचक ट्रेकिंगसाठी ओळखला जातो.
मढे घाट धबधब्याहून रायगड , तोरणा यांसारख्या ऐतिहासिक मराठा किल्ल्यांच्या विहंगम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. वीकेंड येथे प्लान करा. मढे घाट धबधब्याजवळ तोरणा किल्ला आणि राजगड किल्ला यांसारख्या ऐतिहासिक ठिकाणे आहेत.
पठाराच्या कडेवरून कोकणची हिरवीगार मैदाने, लिंगाणा किल्ला आणि वरंधा घाट यांचे विहंगम दृश्य दिसते. तुम्ही येथे निवांत फोटोशूटचा आनंद देखील घेऊ शकता.
दाट जंगलातून पावसाळी ट्रेक आणि हंगामी धबधब्यावर 'रॅपेलिंग' (दोरीच्या साहाय्याने उतरणे) यांसारख्या साहसी उपक्रमांसाठी हा परिसर लोकप्रिय आहे.
पुण्यात अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे आहेत, ज्यामध्ये शनिवारवाडा, आगा खान पॅलेस आणि सिंहगड किल्ला यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
पावसाळ्यात पुण्याला वीकेंड ट्रिप प्लान करा. तुम्ही पानशेत धरण, मुळशी तलाव आणि मुळशी धरणाला भेट द्या.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.