Mumbai Tourism : मुंबईच्या पावसात 'या' ठिकाणी फिरण्याची मजा काही वेगळीच, रविवारी मित्रांसोबत घालवा निवांत संध्याकाळ

Shreya Maskar

पावसाळा

रिमझिम पावसात कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत तसेच जोडीदारासोबत फिरण्याचा प्लान करा. येणारा वीकेंड बाहेरगावी नाही तर मुंबईतच प्लान करा.

Monsoon | pinterest

वीकेंड ट्रिप

वीकेंडला रविवारी संध्याकाळी कुठे फिरण्याचा प्लान करत असाल तर मुंबईतील गिरगाव चौपाटी हे बेस्ट लोकेशन आहे. रिमझिम पावसात येथे धमाल, मजा-मस्ती करता येईल.

trip | pinterest

गिरगाव चौपाटी

गिरगाव चौपाटी येथे सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तसेच येथे समुद्रकिनारी सी फूड आणि स्ट्रीट फूडचा आनंद घेता येतो.

Girgaon Chowpatty | google

मरीन ड्राइव्ह

गिरगाव चौपाटी हे ठिकाण दक्षिण मुंबईतील 'मरीन ड्राइव्ह'च्या उत्तर टोकावर वसलेले आहे. वीकेंडला येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Marine Drive | pinterest

सांस्कृतिक महत्त्व

गिरगाव चौपाटी गणेश विसर्जनासाठी प्रसिद्ध आहे. येथे ११ दिवसांच्या मोठ्या गणपतींचे विसर्जन होते. तसेच गौरी-गणपतीचे विसर्जनही येथे होते.

Ganesh Visarjan | google

फोटोशूट

तुम्ही सकाळ- दुपारच्या दरम्यान येथे फोटोशूटला जाऊ शकता. कारण तेव्हा पावसाळ्यात थंड वातावरण असते, तसेच गर्दी देखील कमी असते.

Photoshoot | pinterest

इतर ठिकाण

गिरगाव चौपाटीजवळच मरीन ड्राइव्ह आणि गेटवे ऑफ इंडिया ही पर्यटन स्थळे आहे. पावसाळ्यात परदेशी पर्यटकही येथे गर्दी करतात.

Gateway of India | yandex

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Mumbai Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...