Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Shreya Maskar

मरीन ड्राइव्ह

मरीन ड्राइव्ह हे मुंबईतील सर्वात सुंदर लोकेशन आहे. येथे समुद्रकिनाऱ्यावर बसून तुम्ही निवांत वेळ घालवू शकता. सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळेल. तसेच रिमझिम पावसात जोडीदारासोबत चहाचा आस्वाद घ्या.

Marine Drive | pinterest

वांद्रे बँडस्टँड

अरबी समुद्राच्या काठावर असलेला खडकाळ आणि रोमँटिक ठिकाण आहे. येथून ऐतिहासिक वांद्रे किल्ला आणि दूरवरचा सी-लिंक दिसतो. संध्याकाळच्या गार वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

Bandra Bandstand | pinterest

वरळी सी-फेस

वरळीतील हे एक मोकळ्या हवेचे ठिकाण आहे. येथे तुम्ही सुंदर फोटोशूट देखील करू शकता. निवांत गप्पा मारू शकता.

Worli Sea Face | pinterest

कार्टर रोड प्रोमेनेड

वांद्रे येथील हा समुद्रकिनाऱ्यालगतचा एक गजबजलेला परिसर आहे, जिथे बसण्यासाठी जागा आणि जवळच खाण्यापिण्याची ठिकाणे आहेत. निवांतपणे सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी हे सुंदर लोकेशन आहे.

Carter Road Promenade | pinterest

हँगिंग गार्डन

मलबार हिलच्या माथ्यावर हँगिंग गार्डनर वसलेले आहे. पावसाळ्यात येथे थंड वातावरण अनुभवता येते. प्राण्यांच्या आकारात कापलेल्या झुडपांसाठी आणि अरबी समुद्रावरील सूर्यास्ताची विहंगम दृश्ये पाहण्यासाठी हे उद्यान प्रसिद्ध आहे.

Hanging Gardens | pinterest

कमला नेहरू पार्क

मलबार हिलवर हँगिंग गार्डनच्या अगदी समोर कमला नेहरू पार्क आहे. हे ठिकाण म्हातारीच्या बुटासाठी प्रसिद्ध आहे.

Kamala Nehru Park | pinterest

छोटा काश्मीर

गोरेगाव पूर्व येथील आरे मिल्क कॉलनीमध्ये छोटा काश्मीर वसलेला आहे. दाट झाडांनी वेढलेला हा एक शांत तलावाचा परिसर आहे. तुम्ही येथे बोटिंगचा आनंद घ्याल.

Chhota Kashmir | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : पावसाच्या सरींमध्ये खुलते अंबरनाथचं सौंदर्य, 'ही' ठिकाणं वीकेंडला पाहायलाच हवीत

Ambernath Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...