Shreya Maskar
पावसाळ्यात मुंबईजवळ वन डे ट्रिप प्लान करत असाल तर अंबरनाथ येथे सुंदर ठिकाणे आहेत. तुम्ही येथे फॅमिली ट्रिप प्लान करू शकता.
अंबरनाथ हे ठाणे जिल्ह्यातील एक पूर्व उपनगरीय शहर आहे. हे शहर मुंबई महानगर क्षेत्राचा भाग असून, ते मुंबईपासून ईशान्येस सुमारे ६० किलोमीटर आणि ठाणे शहरापासून २६ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.
अंबरनाथ पूर्व येथील शिव मंदिर रोडवर श्री अंबरेश्वर शिव मंदिर वसलेले आहे. हे ११ व्या शतकातील प्राचीन दगडी मंदिर आपल्या अद्वितीय वास्तुकलेसाठी आणि शांत, हिरव्यागार परिसरासाठी प्रसिद्ध आहे.
अंबरनाथ पूर्व चिखलोली धरण वसलेले आहे. जे शांतपणे निसर्ग-भ्रमंती करण्यासाठी किंवा पावसाळ्यात निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी उत्तम आहे.
सनसेट पॉइंट हे ठिकाण अंबरनाथमध्ये वसलेले आहे. संध्याकाळचे आकाश पाहण्यासाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी एक मोकळी आणि उंचावरील ही सुंदर जागा आहे.
अंबरेश्वरजवळ तु्म्ही वीकेंडला स्टेकेशनचा प्लान करत असाल तर अनेक रिसॉर्ट आणि वॉटर पार्क आहेत. तुम्हाला येथे मित्रमंडळींसोबत तुफान मजा-मस्ती करता येईल.
वरील सर्व ठिकाणी तुम्ही निवांत फोटोशूट करू शकता. तसेच लहान मुलांना येथे खूप मजा येईल.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.