Shreya Maskar
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात दिवेआगर बीच आहे. हा समुद्रकिनारा कोकण किनारपट्टीवर आहे. मुंबईपासून दक्षिणेस सुमारे १७० किमी आणि पुण्यापासून वायव्येस १६० किमी अंतरावर स्थित आहे.
दिवेआगर बीच स्वच्छ सोनेरी-काळ्या वाळू, नारळ, सुरूची झाडे आणि शांत ग्रामीण वातावरणासाठी ओळखला जातो. बीचजवळ श्री सुवर्ण गणेश मंदिर आहे.
दिवेआगर बीचला पावसाळा आणि हिवाळ्यात भेट द्या. तुम्ही येथे वॉटर स्पोर्ट्स (जलक्रीडा) आनंद घेऊ शकता.
अरबी समुद्राला लागून असलेला दिवेआगर बीच हा स्वच्छ आणि गर्दीविरहित किनारा आहे. तुम्ही येथे निवांत फेरफटका मारू शकता. सूर्यास्ताचा सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो.
दिवेआगर बीचला गेल्यावर आवर्जून जलक्रीडांचा आनंद घ्या. येथे बनाना बोट राईड, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग यांची सोय आहे.
दिवेआगर समुद्रकिनाऱ्याजवळ सुवर्ण गणेश मंदिर आहे. यात गणेशाची सुंदर मूर्ती आहे. येथे शांत आणि मंगलमय वातावरण अनुभवता येते.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.