Shreya Maskar
मुंबईत मालाड येथे एरंगल बीच आहे. हा मुंबईच्या गर्दीत हरवलेला सुंदर समुद्रकिनारा आहे. पावसाळ्यात येथे नक्की भेट द्या.
मालाड पश्चिम येथील मढ बेटावरील एरंगल गावात हा बीच वसलेला आहे. बीचच्या आजूबाजूला खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.
एरंगल बीच येथील शांत ग्रामीण वातावरण, स्थानिक मच्छीमारी संस्कृती आणि सूर्यास्ताची विहंगम दृश्ये यासाठी प्रसिद्ध आहे.
येथे तुम्हाला रंगीबेरंगी किनारपट्टीवरील वस्ती, मासे वाळवण्याची वर्दळ असलेली किनारपट्टी आणि ऐतिहासिक ठिकाण पाहायला मिळते.
स्थानिक मच्छीमार येथे दररोज पकडलेले मासे वाळवण्यासाठी या जागेचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात, ज्यामुळे एक वेगळेच स्थानिक वातावरण निर्माण होते.
तुम्ही येथे संध्याकाळी निवांत फेरफटका मारायला जाऊ शकता. तसेच हे ठिकाण फोटोशूटसाठी देखील बेस्ट आहे.
मालाड येथे अनेक पिकनिक स्पॉट्स आहेत. पावसाळ्यात त्यांचे सौंदर्य खुलते. उदा. मनोरी बीच, मार्वे बीच, दाणापाणी बीच
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.