Shreya Maskar
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागापासून वायव्येस सुमारे १२ किमी अंतरावर पाषाण तलाव हे सुंदर ठिकाण वसलेले आहे.हा तलाव सुतारवाडीजवळ आहे.
पाषाण तलाव हा मानवनिर्मित जलाशय आहे. जो पक्षीनिरीक्षण, निसर्गाच्या सानिध्यात फिरणे आणि सुंदर सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे.
स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांची मोठी संख्या येथे पाहायला मिळते. येथे तुम्हाला बगळे, किंगफिशर पक्षी, बदके यांसारखी १०० हून अधिक प्रजाती पाहता येतात.
येथील स्थानिक लोक संध्याकाळी आणि सकाळी चालण्यासाठी आणि जॉगिंगसाठी येतात. तसेच येथून सूर्योदय किंवा सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटचा आनंद घ्यायचा असेल तर पाषाण तलावाला नक्की भेट द्या. येथे पावसाळ्यात सौंदर्य बहरते.
मुंबईहून तुम्ही पुण्याला ट्रेनने प्रवास करा. त्यानंतर पुणे स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने पाषाण तलावाजवळ पोहचा. येथे वीकेंडला धमाल करता येईल.
पुणे आणि आसपासच्या प्रमुख पिकनिक स्पॉट्समध्ये सिंहगड किल्ला, मुळशी धरण, पवना तलाव यांसारख्या निसर्गरम्य ठिकाणांची नावे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.